आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Preparation For Cashless Transaction, State Bank Agreement Swipe Machine

रेल्वेची कॅशलेसची तयारी, पीओएस मशीन बसवणार; स्वाइप मशीनसाठी स्टेट बँकेशी करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विलासपूर - भारतीय रेल्वेतही आता कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार आहे. तुम्ही डेबिट कार्डाद्वारे रेल्वेत आरक्षणापासून पार्सलसुद्धा नोंदवू शकता. यासाठी अनारक्षित, आरक्षण खिडकीपासून पार्सल विभागापर्यंत स्वाइप मशीन बसवण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने स्वाइप मशीनसाठी स्टेट बँकेशी करार केला आहे. पहिल्या टप्प्यात एसबीआयकडून १० हजार पाॅइंटस ऑफ सेल(स्वाइप)मशीन देण्यात येतील.

रेल्वे बोर्डाचे संचालक एस. के. जैन यांनी सर्व विभागाच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले असून १० डिसेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्व आरक्षित किंवा अनारक्षित तिकीट खिडक्यावर दोन दिवसांत स्वाइप मशीन बसवण्यात याव्यात, असे आदेश दिले आहेत. पत्रात असे म्हटले आहे की, कॅशलेस व्यवहार वाढीसाठी सर्व आरक्षित, अनारक्षित तिकीट खिडक्यावर, पार्सल ऑफिसपासून बाहेरील तिकीट खिडक्यावर पीओएस स्टॉल लागतील. सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना आपल्या गरजेनुसार मशीनची मागणी एसबीआयला करण्याची आणि दोन दिवसांत ती बसवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तर उत्पन्न घटणार नाही
रेल्वे खिडक्यांवरून जुन्या हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. लोकांना एटीएममधून दोन हजार तर बँकेतून २४ हजार रुपये मिळत आहेत. रोख रकमेचा तुटवडा आहे. याचा परिणाम आरक्षण खिडक्यांवर होतो आहे. जनता अनावश्यक प्रवास टाळते आहे. पार्सल बुकिंग कमी होते आहे. बुकिंग एजंट लहान नोटाच्या टंचाईमुळे पार्सल पाठवत नाहीत. स्वाइप मशीनमुळे प्रवासी क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे तिकीट घेतील. चिल्लरची अडचण राहणार नाही.

छोट्या रेल्वे स्थानकांवर अशा प्रकारच्या स्वाइप मशिन बसवण्याची सुविधा केव्हा उपलब्ध होईल याबाबत निश्चित काही स्पष्ट झालेले नाही. मात्र मोठ्या व गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर तातडीने स्वाइप मशीन बसवण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व स्थानकावर सुविधा
भारतीय रेल्वेची ८ हजार ४९५ स्थानके आहेत. एसबीआयने १० हजार स्वाइप मशीन दिल्या तर प्रत्येक स्थानकास किमान १ मशीन तरी मिळेल. तसेही, विभागीय रेल्वेे सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांवर तिकीट खिडक्या आणि पार्सल ऑफिसला विविध सुविधा देण्याच्या तयारीत आहे.
लेखा विभागाची अडचण : स्वाइप मशीन बसवण्याने अंतर्गत अकाउंटिंगची समस्या होती पण याची माहिती घेण्यात आली. एसबीआय मशीन बसवणार आहे, स्वाइपने मिळालेली रक्कम बँकेकडून डीडी किंवा बँकर्स चेकद्वारे संबंधित काउंटरला देण्यात येईल. तीच रक्कम रेल्वे खात्यात जमा होईल. अशा प्रकारे लेखा विभागाची अडचण सोडवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...