आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुशखबर : रेल्वेमध्ये प्राधान्यक्रमाने होईल रिक्त पदांची भरती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विलासपूर (छत्तीसगड) - ५९ वर्षे जुन्या भारतीय रेल्वेच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल होत आहेत. आता भरतीची प्रक्रिया प्राधान्यक्रमावर होत आहे. ज्या पदांची प्राधान्याने आवश्यकता आहे, अशाच पदांची अधिसूचना निघणार आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे बोर्डाला एका क्लिकवर देशभरात कोणत्या युनिटमध्ये कोणकोणत्या श्रेणीतील किती पदे रिक्त आहेत, याची माहिती मिळणार आहे. ऑनलाइन रिक्रूटमेंट मॉड्यूलमुळे हे शक्य होणार आहे. हे मॉड्यूल कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून तयार केले आहे. आॅनलाइन मॉड्यूलला अपडेट करण्याची जबाबदारी संबंधित युनिटच्या पर्सनल विभागाची असेल. हा विभाग स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी, निवृत्ती घेण्यापासून ते शिक्षेमुळे नोकरीतून बडतर्फ होणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करेल. ही माहिती अपडेट होण्याने कोणकोणत्या पदांची सर्वप्रथम भरती प्रक्रिया करायची आहे, याची माहिती वेळेआधीच रेल्वे मंत्रालयास होणार आहे.

असे झाले बदल : युनिटनिहाय एकूण स्वीकृत पदे, कार्यरत कर्मचारी आणि रिक्त पदांची माहिती ऑनलाइन रिक्रूटमेंट मॉड्यूलवर अपडेट करावी, असे आदेश रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या मुख्य पर्सनल अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे काम गेल्या चार महिन्यांपासून चालू आहे. याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०१६ आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत रेल्वे मंत्रालयासमोर भारतीय रेल्वेचे व्यवस्थापन पडद्यावर असेल.

फायदा काय?
आतापर्यंत भारतीय रेल्वेत मॅन्युअली भरती हाेत होती. प्रत्येक झोनचा पर्सनल विभाग आपल्या रेल्वे भरती बोर्डास (आरआरबी) रिक्त पदांची माहिती देण्यात येत होती. देशातील २१ आयआरबी याच आधारे भरती करत असत. आयआरबीला मंजूर पदापैकी किती पदे भरली गेली आहेत, याची कल्पना नसायची. ऑनलाइन मॉड्यूल कामात येताच पर्सनल विभागाकडून रिक्त पदांची माहिती मागवण्याची प्रक्रिया थांबेल. तमाम आयआरबीला त्यांच्या भागातील रेल्वे युनिटची स्थिती माहिती होईल. त्यानुसार भरती होईल.

बेरोजगारांना मिळणार नोकरी
रेल्वे भरती बोर्ड कोणत्याही पदासाठी पॅनेल तयार करताना प्रतीक्षा यादी तयार करते. ती पर्सनल विभागास दिली जाते. विभाग प्रतीक्षा यादी संपवताना इतका वेळ घेतो की, नव्या भरतीची वेळ येते. जी पदे प्रतीक्षा यादीतून भरली जाऊ शकली असती त्यावर थेट भरती होते. नुकसान बेरोजगाराबरोबरच रेल्वेलाही होते. ऑनलाइन प्रतीक्षा यादीचे नियंत्रण रेल्वे भरती बोर्ड करेल. पर्सनल विभागास पदाची भरती थेट करण्याऐवजी प्रतीक्षा यादीतून करण्यास सांगेल.
बातम्या आणखी आहेत...