आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी ‘गो लाइट’ वेबसाइट, मिनिटात 7200 रेल्वे तिकिटे बुक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - आयआरसीटीसी संकेतस्थळावरून तिकिटे बुक करणार्‍या प्रवाशांना आता जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. भारतीय रेल्वेने आता एका मिनिटात 7 हजार 200 तिकिटे बुक करू शकणार्‍या एका सर्व्हरची मदत घेतली आहे. लवकरच जुने सर्व्हर बदलले जाणार असून वापरकर्त्यांची माहिती नवीन सर्व्हरवर टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. सुमारे अडीच कोटी वापरकर्त्यांचा आयडी बदलण्यासाठी आयआरसीटीसीला दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. जुने सर्व्हर एका मिनिटात 2 हजार तिकिटे बुक करण्यास सक्षम होते. नव्या संकेतस्थळाला ‘गो लाइट’ असे नाव देण्यात आले आहे.