आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांची बुलेटप्रूफ कार पाठवण्यात विलंब करणारा रेल्वेचा सुपरवायझर Suspend

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेटप्रुफ कार वेळेत दिल्लीला परत न पाठवल्याप्रकरणी बिलासपूर रेल्वे विभागाचे पार्सल सुपरवाइजर डीके चंदा यांना निलंबित करण्यात आले आहे. सुपरवायझरने सुरक्षा दलांच्या जवानांनी वॉरंट दिल्यानंतर पंतप्रधानांच्या कारची बुकींग केली होती. पण त्याची लेखी माहिती रेल्वे स्थानक प्रशासनाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे पंतप्रधानांची बुलेट प्रूफ कार दिल्लीला पोहोचली नाही. पंतप्रधान नऊ मे रोजी छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सुरक्षेच्या कारणामुले याठिकाणी बुलेटप्रूफ कार मागवण्यात आल्या होत्या.

रविवारीच दिल्लीला पाठवल्या जाणार होत्या कार
सोमवारी या चारही कार दोन दोन कारचे रॅक तयार करून सकाळी गोंडवाना एक्सप्रेस आणि दुपारी राजधानी एक्सप्रेसने रवाना केल्या गेल्या. पण राजधानी एक्सप्रेसने गेलेल्या या गाड्या रविवारी दुपारी उत्कल एक्सप्रेसने पाठवल्या जायला हव्या होत्या. पार्सल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या गाड्या पाठवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे कार घेऊन जाणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही त्यांची तिकिटे रद्द करावी लागली. तसेच त्यांना रात्रभर कारच्या सुरक्षेसाठी त्याच ठिकाणी तैनात राहावे लागले होते.