आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Tatkal Ticket News In Marathi, No Waiting

तत्काळ तिकिटावर आता ऑगस्टपासून वेटिंग नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- रेल्वे प्रवाशांना आता तत्काळ कोट्यातील तिकीट वेटिंगमध्ये मिळणार नाहीत. ही नवी व्यवस्था एक ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून तयारीही सुरू झाली आहे.रेल्वेगाड्यांत तत्काळ कोट्यांतर्गत निर्धारित बर्थचीच बुकिंग करण्यात येईल. यानंतर बुकिंग बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. प्रवाशांना तत्काळचे वेटिंग तिकीट जारी केले जाणार नाही. सध्या तत्काळ कोट्यातील ठरावीक बर्थ बुक झाल्यानंतरही प्रवाशांना वेटिंगचे तिकीट जारी केले जाते. जुलैत सादर होणार्‍या रेल्वे बजेटमध्ये रेल्वेच्या अनेक जुन्या नियमांना बदलण्याची तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून तत्काळ कोट्याच्या बर्थमधील वेटिंग पद्धत संपुष्टात आणली जाणार आहे.