आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माओवाद्यांनी बॉम्बने उडवला लोहमार्ग; बालंबाल बचावली राजधानी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची/लातेहार- झारखंड-बिहार बंदच्या पहिल्याच दिवशी छिपादोहर आणि हेहेगडा रेल्वे स्टेशनदरम्यान माओवाद्यांनी लोहमार्गावर स्फोट घडवून आणला. यात रेल्वे रुळ पूर्णपणे उद्‍धवस्त झाला. याच मार्गावरून रांची ते नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस जाणार होती. जर हा स्फोट पाच ते सात मिनिटे उशीरा झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.

राजधानी एक्स्प्रेस रात्री 9:55 वाजता कुमंडी स्थानकावर थांबली होती. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी (9:53 वाजता) माओवाद्यांनी पोल क्रमांक 252/13 जवळ स्फोट घडवला. जर कुमंडी स्थानकावर राजधानी थांबली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. माओवाद्यांनी राजधानी एक्स्प्रेस उडवण्याच हेतू होता, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.