आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INDIAN RAILWAY: रेल्वेत राहणार विमानासारखे टॉयलेट, ऑनलाइन टिकट बुकिंगची वेळ वाढवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्‍या काही दिवसांत देशातील रेल्‍वे प्रवशांना दोन सुविधा मिळणार आहेत. यामध्‍ये पहिली सुविधा म्‍हणजे आयआरसीटीसीच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन टिकट बुकिंग करण्‍याची वेळ 15 मिनिट वाढवण्‍यात आली आहे. शिवाय 20 सप्‍टेंबरपासून रात्री 12.30 ते 11.45 वाजतापर्यंत ऑनलाइन टिकट बुकिंग करता येणार आहे. दुसरी महत्‍त्‍वाची सुविधा म्‍हणजे जगात पहिल्‍यांदाच भारतीय रेल्‍वेमध्‍ये विमानातील टॉयलेटप्रमाणे म्‍हणजेच ‘हाइब्रिड व्‍हॅक्यूम सेल’ बसवले जाणार आहे. आज (शक्रवार) प्रायोगिक तत्‍त्‍वावर डिब्रूगड राजधानी एक्‍स्‍प्रेसच्‍या 153002/C FAC कोचमध्‍ये ते लावले गेले. त्‍याचे डिजाइन रेल्‍वेच्‍या डेव्‍हलपमेंट सेलने तयार केले आहे.
असे काम करणार नवीन टॉयलेट
ट्रेनचया खालील बाजूस एक टँक लावलेला असतो. यामध्‍ये विशेष बॅक्टीरिया असतात. हे बॅक्‍टीरिया विष्‍टेला पाणी आणि वायूत बदलवून टाकतात.
हे फायदे होणार
सध्‍या ट्रेनमध्‍ये जे टॉयलेट्स आहेत. त्‍यांना एकवेळा फ्लश केल्‍यानंतर 10 ते 15 लीटर पाणी वापरले जाते. पण, हाइब्रिड वॅक्यूम टॉयलेट्समध्‍ये यासाठी केवळ अर्धा लीटर पाणी लागणार आहे. म्‍हणजे रोज लाखो लीटर पाणी वाचणार आहे. दुसरा महत्‍त्‍वाचा फायदा म्‍हणजे ट्रॅकवर घाण होणार नाही.