आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान्य भारतात अनेक ठिकाणी ढगफुटी, भूस्खलनात 12 जणांचा बळी; पुरात वाहून गेले 10 जण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - ईशान्य भारतात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. आसाम मणीपूर आणि मिझोरमसह त्रिपुरा येथील अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याचे आणि भूस्खलनाचे प्रकार घडले आहेत. या घटनांमध्ये मंगळवारपर्यंत 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे, मिझोरमच्या नदीत 10 जण वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. लोकांना सुखरूप ठिकाणी पोहचणे तसेच हरवलेल्यांना शोधून काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. 
 
 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिझोरमच्या करनाफुलू नदीवर ढगफुटीने अचानक पूर आले. या पुरात 10 जण वाहून गेले असून त्यांना शोधण्यासाठी मोहिम सुरू आहे. बचाव पथकाने बुधवारी त्यापैकीच एकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. 

- डोंगराळ भागांमध्ये अनेक दुर्घटना ह्या ढगफुटीने घडल्या आहेत असे प्रशासनाने म्हटले आहे. यात मिझोरममध्ये 400 घरांचे नुकसान झाले आहे. 

- मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने मिझोरम आसाम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 54 ला सुद्धा नुकसान झाले आहे. त्यामुळे, अनेक शहरांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. 
 
 
पुढील स्लाईड्सवर पाहा... भूस्खलनात अशी वाहून गेली घरे....