आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील मदतकार्यात अडथळा, हवाई दलाचे विशेष विमाने तैनात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. चामोलीमध्ये अनेक घरे कोसळली असून भागीरथी नदीला महापूर आल्याने अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, मदतकार्यासाठी हवाई दलाने विशेष विमाने तैनात केली आहेत.


चामोली, रुद्रप्रयाग, पिथोरगड व उत्तरकाशीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने हेलिकॉप्टर्सना अन्नाची पाकिटे तसेच औषधे पुरवता आली नाहीत. त्यामुळे राज्याच्या विनंतीवरून आता हवाई दलाने सी-130 हर्क्युलस विमाने तैनात केली आहेत.


घर कोसळले, तिघांचा मृत्यू : डेहराडूनमध्ये सोमवारी पावसामुळे वाहून आलेल्या ढिगा-यामुळे एक घर कोसळले. यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. दोन मुले व त्यांच्या आईचा मृतांत समावेश आहे. अजूनही अनेक वस्त्यांना पाण्याचा धोका असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.


चालकरहित विमाने
उत्तराखंडमध्ये मदतकार्यासाठी तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी चालकरहित विमान ‘दक्ष’ तैनात करण्यात आले आहे. राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. शशिधर रेड्डी यांनी ही माहिती दिली.