आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूला पावसाचा तडाखा, शहर जलमय; बंगळुरूसह म्हैसूर, तुमकुरू शहरांना झोडपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूसह म्हैसूर, तुमकुरू शहरांना पावसाने झोडपून काढले आहे. बंगळुरूतील तलाव तुडुंब भरला आहे. त्यामुळे शहरात पाणीच पाणी झाले आहे. गेल्या चोवीस तासांत ७० मिमी पावसांची नोंद झाली. शनिवारी एका नाल्यातून १८ वर्षीय मुलगा वाहून गेला. शहरात १३५ झाडे कोसळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातही रविवारी चांगला पाऊस झाला. 

आसामचे संकट वाढले
अासाममधील पुराचे संकट आणखी गंभीर बनले आहे. अरुणाचलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूर आला आहे. पाच जिल्ह्यांतील ७१ हजार ८१९ लोकांना त्याचा फटका बसला आहे. तीन जिल्ह्यांतील २८ हजार लोक बेघर झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...