आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधांनांच्या वाराणसी दौर्‍यावर फिरले पाणी, विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौर्‍यांवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे. वाराणसीत मुसळधार पाऊस सुरु असून परिणामी नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा दुसर्‍यांचा रद्द करण्‍यात आला आहे. दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी उभारण्‍यात आलेल्या व्यासपीठाची सजावट करताना विजेचा धक्का बसून एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

पंतप्रधान आज (गुरुवार) वाराणसीच्या नियोजित दौर्‍यावर जाणार होते. दुपारी तीन वाजता येथील ट्रॉमा सेंटरच्या उद्धाटनासह अनेक योजनांचा प्रारंभ मोदींच्या हस्ते करण्यात येणार होता. मात्र, वाराणसीत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोदींचा दौरा रद्द झाला आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात 28 जूनला देखील मुसळधार पावसामुळे मोदींचा वाराणसी दौरा रद्द झाला होता. दौरा रद्द झाल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीच्या जनतेची क्षमा देखील मागितली होती.
व्यासपीठाची सजावट करताना मजुराचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर भव्य व्यासपीठ उभारण्याचे काम बुधवारी रात्री सुरु झाले होते. व्यासपीठाची सजावट करताना रात्री एक मजुराला विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. देवनाथ (20) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मोदींच्या व्यासपीठासाठी करण्यात आला होता नऊ कोटींचा खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी या आधी 28 जूनला वाराणसीचा दौरा करणार होते. त्यासाठी वॉटरप्रूफ टेंट उभारण्यात आला होता. एवढेच नव्हे तर चिखलापासून खराब होऊ नये म्हणून 'वुडन फ्लोरिंग' देखील लावण्यात आले होते. यासाठी जवळपास नऊ कोटी रुपये खर्च करण्‍यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा दौरा ऐनवळी रद्द करण्‍यात आला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाची मुसळधार पावसामुळे झालेली अवस्था...