आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममध्ये विद्यार्थ्याची बिल्डिंगवरुन उडी, छत्तीसगडमध्ये 36 विद्यार्थ्यांच्या मनगटावर निशाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्ल्यू व्हेल गेममुळे 10 पेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केली आहे. (प्रतिकात्मक) - Divya Marathi
ब्ल्यू व्हेल गेममुळे 10 पेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केली आहे. (प्रतिकात्मक)
रायपूर/गुवाहाटी - आसाममधील सिलचर येथे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने ब्ल्यू व्हेल गेम खेळताना बिल्डिंगवरुन उडी मारली. विद्यार्थी थोडक्यात बचावला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये 36 मुलांनी हातावर माशाचा आकार कोरला आहे. गुरुवारी पोलिसांनी बालोद येथील शाळेतील 6 मुलांना ब्ल्यू व्हेल खेळताना पकडले. दंतेवाडा येथे एका प्राचार्याला मिळालेल्या पत्रात म्हटले आहे की 30 विद्यार्थ्यांनी हातावर कोरले आहे. हे सर्वजण एखादा ऑनलाइन गेम खेळत असण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेम खेळणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्यात म्हटले आहेकी एक पझल गेम खेळत असताना उत्तर मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे. रशियामध्ये तयार झालेला हा गेम भारतात बॅन करण्यात आला आहे, मात्र अजूनही काही लिंक उपलब्ध आहे. दोन महिन्यात या खेळाने 10 पेक्षा जास्त बळी घेतले आहे. जगभरात 130 पेक्षा जास्त लोकांनी ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या केली आहे. 
 
पोलिस काय म्हणाले...
- बालोदचे पोलिस आयुक्त दीपक झा म्हणाले, पोलिसांना माहिती मिळाली की एका खासगी शाळेतील काही विद्यार्थी ब्ल्यू व्हेल गेम खेळत आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सर्व पसार झाले होते. विद्यार्थ्यांच्या पालकांना याची कल्पना देण्यात आली असून त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहे. 
- दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव म्हणाले, गुरुवारी जेव्हा आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा 30 पैकी 26 मुलं गैरहजर होते. सर्व मुले ही 8वी ते 10वीच्या वर्गातील आहे. यात काही विद्यार्थीनी देखील आहे. काही मुलांनी हाताच्या मनगटावर क्रॉस तयार केले तर काहींनी रेषा मारलेल्या होत्या. काहींच्या जखमा या ताज्या होत्या, या कृत्यामागे ब्ल्यू व्हेल आहे की दुसरे काही कारण याचा शोध घेतला जात आहे. 
- पोलिसांनी पालकांना या घटनेची माहिती देऊन पाल्यांवर लक्ष्य ठेवण्याचे निर्देश दिले आहे. 
 
विद्यार्थ्यांनी काय सांगितले
- दंतेवाडा येथील चार विद्यार्थ्यांनी सांगितले की आमची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. आम्हाल सांगण्यात आले की हातावर कोरल्यानंतर घरात पैसा येईल. एकाने सांगितले वडील दारुडे आहे, असे केल्याने त्यांचे व्यसन सुटेल म्हणून हातावर क्रॉसचा आकार कोरला होता. एकाने मित्राने चॅलेंज दिल्याचे सांगितले. 
 
जशपूरमध्ये 25 हजारांवर जणांनी सर्च केला ब्ल्यू व्हेल
- गेल्या 7 दिवसांमध्ये छत्तीसगडमधील जशपूरमध्ये 25 हजार पेक्षा जास्त जणांनी ब्ल्यू व्हेल गेम ऑनलाइन सर्च केला. आयटी एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, जशपूरनंतर दुर्ग-भिलाई हा प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथून 15 हजार जणांनी हा जीवघेणा गेम सर्च केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर जगदलपूर आहे. येथे 12 हजार जणांनी इंटरनेटवर हा गेम सर्च केला. 

हिमाचलमध्ये विद्यार्थ्याने घेतली फाशी 
- हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी ब्ल्यू व्हेल गेमचे पहिले प्रकरण समोर आले. येथील 10 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्याने सुसाइड नोट देखील लिहून ठेवली होती. त्यात म्हटले होते एक पझल गेम सोडवू न शकल्याने आत्महत्या करत आहे. 
- हा विद्यार्थी बाधू या ठिकाणी गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये 5वीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या राहात्या घरी छताला लटकलेली बॉडी सापडली होती. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजले की हा गेम ब्ल्यू व्हेल गेम होता. मुलगा कुटुंबातील एका सदस्याच्या मोबाइलमध्ये हा गेम खेळत होता. 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, जशपूरच्या मुलीने फेसबुकवर टाकला असा फोटो...
बातम्या आणखी आहेत...