आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी-मजुरांच्या मुलांचा गावात ढोल वाजवून जागर : मुलींना खूप शिकवा, कोवळ्या वयात लग्न करू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - दहावीच्या परीक्षेनंतर पुन्हा शाळा उघडली तेव्हा सावित्री मैत्रिणीसोबत दिसली नाही. अनेक दिवसांनंतरही ती शाळेत येईनाशी झाल्यावर मैत्रिणींचे पाय तिच्या घराकडे वळले. सावित्रीच्या गैरहजेरीचे कारण विचारल्यावर नातेवाईक म्हणाले, आता आणखी किती शिकणार? मैत्रिणींनी खोलात चौकशी केली तेव्हा सावित्रीच्या घरचे तिचे लग्न लावण्याच्या तयारीत असल्याचे कळले.

सावित्री रायपूरपासून १४० किमी अंतरावर डाँडी तालुक्यातील उकारी गावात राहते. तिचे वर्गमित्र, मैत्रिणी आसपासच्या गावच्या. विद्यार्थ्यांनी ही बाब शिक्षकांना सांगितली. यावर शिक्षकांनी जनजागरण अभियान राबवण्याचा सल्ला दिला. या गटात ८ वी ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. शाळा सुटल्यानंतर ९ विद्यार्थी सायकलवर ४ किमीवरील मरकाटोला गावात पोहोचतात. तेथील आठवडी बाजारात विद्यार्थी ढोल वाजवतात व भोज व छन्नू गाण्यास सुरुवात करतात.

‘जागो भैया-भौजी, दाई-ददामन शिक्षा है महान, टूरा संग टूरी ल खूब पढाबो, गांव ल आगे बढाबो’ गर्दी जमा झाल्यानंतर मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी आवाहन केले जाते. मुलींच्या शिक्षणातून गावचा व कुटुंबाचा विकास होत होतो. शिवाय लहान वयात मुलींचे लग्न न करण्याची विनंतीही त्यांच्याकडून केली जाते. या कामाची सुरुवात गावच्या बाजारातून केल्याचे छन्नू दास माणिकपुरीने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...