आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raising Question Over Prime Minister Narendra Modi’s Idea Of A “cashless Society”,

पंतप्रधान मोदींच्या ‘कॅशलेस सोसायटी’वर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कॅशलेस सोसायटी’ कल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामीण भागातील जनतेला ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने कोणती पावले उचलली, असा प्रश्न त्यांनी विचारला.
एका कार्यक्रमात अखिलेश म्हणाले की, डिजिटल इंडियासाठी काय तयारी केली हे मोदींनी सांगावे.
कॅशलेस ट्रान्झेक्शन कोण शिकवणार? ते खेड्यांपर्यंत कसे पोहोचणार? युवक कदाचित ते करू शकतील, पण इतरांचे काय? आम्ही खेड्यांना लॅपटॉप दिले आहेत. आमच्या स्मार्टफोन योजनेसाठी आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. जे सरकार लोकांना वेदना देते ते फार काळ टिकत नाही.

केंद्र सरकार आणि आपले राज्य सरकार यांच्या कामगिरीची तुलना करताना अखिलेश म्हणाले की, आमच्या सरकारने गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये विकासाची प्रचंड कामे केली आहेत. केंद्र सरकारने त्याच्याशी स्वत:ची तुलना करावी. केंद्र सरकारवर टीका करताना अखिलेश म्हणाले की, नोटाबंदीमुळे भाजपच्या सर्व यात्रा अपयशी ठरल्या आहेत. लोकांना रांगेत उभे राहावे लागल्याने या यात्रा यशस्वी ठरल्या.
बातम्या आणखी आहेत...