आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाठीमारात राज बब्बर जखमी, काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांचा गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - कायदा व्यवस्थेसह अनेक मुद्द्यांवर अपयशी ठेवल्याचा ठपका ठेवत उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात विधानसभेबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर सोमवारी लाठीचार्ज करण्यात आला. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री, अभिनेता राज बब्बर यांच्यासह १५ जण जखमी झाले.

दरम्यान, लखनऊच्या आमदार रिता बहुगुणा जोशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली आहे. सोमवारी काँग्रेसच्या विरोध प्रदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या बाहेर धरणे दिले. मात्र, पोलिसांनी त्यांना तेथून हाकलून लावल्यानंतर ते लक्ष्मण मेला मैदानात पोहोचले.

त्या ठिकाणाहून पुन्हा विधानसभेकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना पिटाळून लावण्यासाठी पाण्याचा मारा केला. त्यानंतरही कार्यकर्ते माघार घेत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान, प्रत्युत्तरात आंदोलकांनी दगडफेकही केली.