आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackrey Election Campaign Rally In Aurangabad.

पत्नीच्या नावावर घर करणा-याला कर माफ ; राज ठाकरे यांनी दिले आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - फाइल फोटो
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत युती आणी आघाडीवर सडकून टीका केली. राज्यातील सगळे प्रश्न सुटले फक्त राज्यातील चार पक्षांच्याजागावाटपाचा प्रश्न शिल्लक होता, असे ते म्हणाले. तसेच पत्नीच्या नावावर घर करणा-याला कर माफ करण्याचे आश्वासनही राज यांनी दिले.
काय म्हणाले राज ठाकरे...
महाराष्ट्राच्या विकासाकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. पण महाराष्ट्राचा विकास हाच माझा ध्यास आहे. त्यासाठी ब्लूप्रिंट तयार आहे. पण मनसेला सत्ता दिली तरच ते करणे शक्य आहे. महाराष्ट्रातून निवडून जाणारे खासदार आमदार फक्त मुंबई पुण्यात राहतात. तीन चार वर्षांनी तुम्हाला तोंड दाखवतात.
शिक्षणसम्राटाची बिरुदं लावणारा दहावी नापास. पैसा मिळाला म्हणून कॉलेजं काढली आणि बनले शिक्षणसम्राट. पण राज्यात कसे उद्योग यावे आणि तसे शिक्षण द्यावे असे त्यांना वाटत नाही. पण मी अनेक क्षेत्रांतून हजारो रोजगार उपलब्ध करून दाखवेल. मी हे उगाच म्हणत नाही. मी जग पाहिले आहे. विविध देश पाहिले आहेत, त्यामुळे मी हे बोलतो आहे. आपल्याकडे पर्यटनाचा एवढी मोठी संपत्ती आहे. पण आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही. बाहेरच्या देशांत केवळ पर्यटनावर सर्व अर्थव्यवस्था चालते. आमच्याकडे जागतिक वारसा आहे. जगभरातील लोक शोधत येतात. पण आपण दाखवायला तयार नाही.
महाराष्ट्रातील एका एका गोष्टीला पर्यटनातून हजार हजार कोटी रुपये मिळू शकतात. पण त्याकडे लक्ष द्यायला कुणालाही लक्ष नाही. जगाने शिवरायांची दखल घेतली पण आपल्याला त्यांची किंमत कळली नाही. सर्व पक्षांनी मतदारांना गृहित धरले आहे. त्यांचा गैरसमज दूर केल्याशिवाय त्यांना धडा मिळणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेवर आहे. पण त्यांच्या नाकर्तेपणाला त्यांच्याएवढेच शिवसेना - भाजपचे नेते आहेत. त्यामुळेच त्यांना 15 वर्षे सत्तेवर राहता आले.
राज्यातील चारही पक्षांची आतून मिलिभगत आहे. विधानसभेत आमदार, मंत्र्यांच्या सेटलमेंट सुरू असतात. शरद पवारांनी भाजपच्या एका नेत्याला सांगितले तुम्ही युती तोडा लगेच मी आघाडी तोडतो. ही राज्यातील जनतेची चेष्टा आहे.