आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajaram Pandey Sacked, Red Beacon Removed From Jaya Prada\'s Car

अभिनेत्री हेमा मालिनी, माधुरीच्या गालावर कमेंट; उत्तरप्रदेशात मंत्री निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि माधुरी दीक्षितच्या गालांवर प्रतिक्रिया देणे उत्तर प्रदेशातील एका मंत्रीला चांगलेच महागात पडले आहे. उत्तर प्रदेशातील खादी व ग्रामोद्योग मंत्री राजाराम पांडेय यांना निलंबित करण्‍यात आले आहे राजाराम पांडेय यांनी राज्यातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी आणि माधुरी दीक्षितच्या गालांसोबत केली होती.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या शनिवारी रात्री राजाराम पांडेय यांना ‍तडकाफडकी निलंबित केल्याचे राज्याचे मुख्य सचिव जावेद उस्मानी यांनी सांगितले. राज्यपाल बीएल जोशी यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. करण्यात आले आहे.

दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या खासदार जयाप्रदांच्या गाडीचा लाल दीवा काढण्यात आला असून त्यांच्यावर दंडही ठोठावण्यात आला आह. जयाप्रदा या रामपूरच्या खासदार आहे.