आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान : येथे महागात पडू शकते स्वस्तातले सोने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलवर(राजस्थान) - राजस्थानातील अलवर जिल्ह्यात पोहोचणा-या पाचही रस्त्यांवर सतर्क करणा-या पाट्या आहेत. येथे सोने खरेदी कराल, तर महागात पडेल, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, एवढे इशारे दिले तरी फसव्यांच्या जाळ्यात लोक हमखास अडकतातच. त्यामुळेच तर आंध्र प्रदेशातून मन्सूर शेख नावाची व्यक्ती स्वत:हून इथवर आली. त्यांना फोनवरच सांगण्यात आले होते की, 25 लाख रुपयांत तीन किलो सोन्याची बिस्किटे मिळतील. ही बिस्किटे खोदकामात सापडलेली असल्याचेही सांगितले गेले. मन्सूर 20 लाख रुपये घेऊन पोहोचले. गुंडांनी त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेतले आणि त्यांना ओलीसही ठेवले.


शिकार कशी गाठतात?
मेवातचे लोक गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात जेसीबी चालवण्यासाठी येतात. काही महिन्यांनंतर त्यांना तेथील लोकांची ओळख होते. संपर्क वाढतो. काही मोबाइल नंबर मिळतात. नोकरी केल्यानंतर ते स्वत:च्या गावी परततात आणि मग सुरू होतो विटा विकण्याचा धंदा. स्थानिक पातळीवरच गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारचे 75 टक्के खटले दाखल झाले आहेत. देशभरातील अशा प्रकारच्या घटनांचे मोजमापच नाही. लुटल्या गेलेल्यांमध्ये सर्वसामान्यच नाही, तर व्हीआयपीसुद्धा आहेत. तीन वर्षांपूर्वी कर्नाटकचे डीजीपी अजयकुमार यांना फसवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता.


पद्धत बदलली
पूर्वी नकली सोन्याच्या विटा बनवून फसवण्याची या लोकांची खेळी आता कालबाह्य झाली आहे. फसवणारे लोक खूप मार खातात. त्यामुळे त्यांनी आता अधिक सुरक्षित मार्ग अवलंबला आहे. दावा तोच असतो.. सोन्याच्या विटा विकायच्या आहेत, स्वस्त मिळतील. ज्याला भुरळ पडली तो फसला.