आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुकंपासाठी विवाहित मुलगीही पात्र, राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्वाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) - Divya Marathi
(फाइल फोटो)
जोधपूर - अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना अर्जदार विवाहित असली तरी ती पात्र आहे , असा निर्वाळा राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. तीन महिन्यांत अर्जदारास नोकरीवर घ्यावे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.    
 
याचिकाकर्ता सोनुदेवीच्या वतीने अॅड. प्रमेंद्र बोहरा यांनी याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, माध्यमिक शिक्षण विभागात श्रीगंगानगरमध्ये याचिकाकर्त्यांचे वडील कृष्णलाल व्याख्याता या पदावर कार्यरत होते. १८ मार्च २०११ रोजी त्यांचे निधन झाले.  तेव्हा याचिकाकर्ता अविवाहित होती. तिने अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी विभागाकडे ५ फेब्रुवारी २०१३ रोजी अर्ज सादर केला. अर्जासोबत इतर बहिणी आणि भावांचे शपथपत्र जोडले होते. अर्ज केल्यानंतर २९ नोव्हेंबर २०१३ दरम्यान तिचा विवाह झाला. परंतु माध्यमिक विभागाने २० फेब्रुवारी २०१४ रोजी नियुक्तीच्या वेळी ती विवाहित असल्याचे सांगून नियुक्तीस नकार दिला.    
 
अधिवक्त्यांनी बाजू मांडताना म्हटले, अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासंदर्भातील नियम १९९६ मध्ये म्हटले आहे की, अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळण्यासाठी अर्ज सादर करताना तिची पात्रता व परिस्थितीचे अवलोकन केले जाईल. याचिकाकर्त्याने अर्ज केला तेव्हा ती अविवाहित होती. न्या. संजीव प्रकाश यांनी याचिका मंजूर केली आणि तिला तीन महिन्यांच्या आत नोकरी द्यावी, असे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...