आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात रस्त्यांना दिले मुलींचे नाव, संगरिया गावाचे कौतुकास्पद पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगरिया (राजस्थान) - राजस्थानात संगरिया तालुक्यातील अमरपुरा जालू ही छोटीशी ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीने येथील मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. गावातील रस्त्यांना नेत्यांची नव्हे तर मुलींची नावे असावीत. एवढेच नाही तर कोनशिलेवरही मुलींचीच नावे झळकली पाहिजेत, असा या गावचा आग्रह आहे. विशेष म्हणजे इथे रस्त्यांचे उद्घाटनही मुलींकडूनच होते. रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ झाला.  
 
अमरपुरा जालू खाटमध्ये रविवारी ९.८० लाख रुपये खर्चातून बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन झाले. रस्त्याचे नामकरण बिरखा-साक्षी मार्ग करण्यात आले आणि त्याचे उद्घाटन पुनिया, बिरखा, राणी, पुष्पा, साक्षी, मानवी व कमलदीप कौर या सहा मुलींच्या हस्ते करण्यात आले. सर्व सहा मुलींची नावेही कोनशिलेवर आहेत.  
 
सरपंच अॅड. राजेंद्र मूंड यासंदर्भात म्हणाले, गावातील प्रत्येक घरात मुलीचा गौरव व्हावा. कोणत्याही घरी मुलींचे ओझे वाटायला नको, अशी आमची इच्छा आहे. उद्घाटक सहा मुलीही कामगार, शेतकरी, माळी आदी सर्व वर्गातील आहेत. लोकांनी मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा हा त्यामागचा उद्देश आहे. ९.८० लाख रुपये खर्चातून या रस्त्याचे बांधकाम झाले.  
 
मुलींच्या आनंदाला पारावार नाही : आपल्या हातून रस्त्याचे उद्घाटन होणार हे कळल्यावर सहाही जणींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सर्वसाधारणपणे लोकप्रतिनिधीच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन केले जाते. गावात पहिल्यांदाच आम्हाला असा मान मिळाल्याची भावना मुलींनी व्यक्त केली. 

आई-वडिलांना मुलींचे ओझे वाटू नये यासाठी उपाय  
सरपंच राजेंद्र मुंड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “बेटी बचाओ बेटी पढाओ’चा नारा दिला आहे. याच विचारातून मुलींची संख्या वाढावी व आई-वडिलांनाही प्रतिष्ठा मिळावी यासाठी आपणही काहीतरी करावे असे वाटले. त्यातूनच रस्त्याला मुलींचे नाव देण्याचे ठरले. भविष्यातील योजनांमध्येही मुलींना स्थान दिले जाईल.
बातम्या आणखी आहेत...