आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी राजस्थानी दगडांचे 200 ट्रक यूपीत; योगी सरकारने बंदी उठवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थान आणि उत्तर प्रदेशात एकाच पक्षाचे सरकार असल्याने त्याचा थेट फायदा अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कामात होत आहे. यामुळेच राजस्थानातील अयोध्येस पाठवण्यात येणाऱ्या दगडावर अखिलेश यादव सरकारच्या काळात दोन वर्षे अघोषित बंदी होती. मात्र, आदित्यनाथ योगी सत्तेवर आल्यानंतर बंदी हटली आहे.  
 
दोन दिवसांपूर्वी भरतपूरच्या बन्सी पहाडपूर येथून ३०० टन लाल दगड अयोध्येस पाठवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत येथून सुमारे ७५ हजार घनमीटर म्हणजे २०० ट्रक दगड अयोध्येस पाठवण्याची ऑर्डरसुद्धा देण्यात आली आहे.  बंदीच्या काळात दोन वर्षांपूर्वी दगड आणण्यावर बंदी आणण्यात आली होती. त्या वेळी दोन ट्रक दगड अयोध्येत पोहोचले होते. त्यानंतर वाणिज्य कर विभागाने दगड आणण्यास बंदी घातली. भाजपच्या योगी सरकारने बंदी हटवली आहे. विश्व हिंदू परिषदेने देणगी देण्याचे आवाहन केल्यानंतर बन्सी पहाडपूरच्या उत्खनन विभागाच्या कामास गती आली आहे. १४ जून २०१५ रोजी विहिंपच्या मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत मंदिरासाठी जास्तीत जास्त दगड दान द्यावेत, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होेते.  

३० ऑगस्ट १९९० रोजी अयोध्येत कारसेवकपुरम येथे दगड घडवण्याच्या कामात सुरुवात झाली होती. राजस्थानातील पिंडवाडा येथे तीन कार्यशाळांमधून हे काम चालू होते. आतापर्यंत गर्भगृह, तळमजल्यावरील सिंहद्वार, नृत्य मंडप आणि कोळी गर्भगृहासाठी दगड घडवण्याचे काम पूर्ण झाले होते. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील खांब आणि भिंती तसेच अन्य कामासाठी दगड पाठवण्यात येत आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर भरतपूरहून दगड पाठवण्याच्या काम थोडे मंदावले आहे.

भिंती आणि खांबांसाठी या दगडांचा वापर   
या दगडांचा वापर राममंदिराच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील १४ फूट उंच आणि चार फूट रुंद अशा ७० खांबांसाठी, भिंतींसाठी करण्यात येणार आहे. वादग्रस्त इमारत पाडल्यानंतर राजस्थानातील सिरोही जिल्ह्यातील पिंडवाडा येथे मोठ्या प्रमाणावर राममंदिरासाठी दगड घडवण्याचे काम सुरू झाले होते. येथील साेमपुराचे मार्बल आणि अन्य संस्थांकडून बन्सी पहाडपूर येथील दगड घडवूनच अयोध्येत पाठवण्यात आले आहेत. सोमपुरा येथील मार्बलचे विक्रेते हितेशभाई यांनी सांगितले, मशीद पाडल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पिंडवाडा येथील राम मंदिरासाठीचे दगड घडवण्याचे काम बंद करण्यात आले होते. आता राजस्थानातील २० कारागीर दिवसरात्र दगडावर नक्षीकाम करण्यात गुंतले आहेत. कारागीर गिरीशभाई येथेच काम पाहतात.

बन्सी पहाडपूरचे दगड देशभरात प्रसिद्ध  
मंदिराचे काम बघण्याऱ्या विहिंपच्या संस्थेने भरतपूरच्या रुदावल भागात असलेल्या बन्सी पहाडपूरमधून निघणारा लाल रेतीचा दगड  यासाठी उपयुक्त मानला गेला आहे. राम मंदिरासाठी एकूण १ लाख ७५ हजार घनफूट दगड लागणार आहे. एक लाख क्युबिक फूट दगड अयोध्येत पोहोचला आहे. आतापर्यंत अयोध्येस पाठवण्यात आलेले दगड सजावटीसाठीचे होते.

गुणवत्तेसाठी एका खाणीस ऑर्डर  
एकसारखा रंग आणि उत्तम दर्जा यासाठी बहुतांश दगड एकाच खाणीच्या म्हणजे हरिओम स्टोनने पाठवण्यात येत आहे. खाण मालक राजू भाई यांनी सांगितले, लवकरच आणखी ट्रक पाठवले जातील.
 
बातम्या आणखी आहेत...