आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक गेहलोत यांचा विजय, 18 हजार मतांनी केली शंभूसिंह यांच्‍यावर मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरदारपुरा- कॉंग्रेसचे दिग्‍गज नेते अशोक गेहलोत सरदारपुरा मतदारसंघातून प्रतिस्‍पर्धी उमेदवार भाजपचे शंभूसिंह यांचा 18 हजार मतांनी पराभव केला. अशोक गेहलोत आतापर्यंत सरदारपुरा मतदार संघातून निवडून आलेले आहेत. परंतु, प्रत्‍येकवेळी त्‍यांच्‍या विजयाचे अंतर कमी-कमी होत गेले आहे. कोणत्‍याही परिस्थितीत गेहलोत यांना पराभूत करण्‍याची तयारी शंभूसिंह यांनी केली होती.

गेहलोत यांना मुख्‍यमंत्री होण्‍याचा फायदा मिळाल्‍याचा दावा ज्‍येष्‍ठ पत्रकार जगदीश शर्मा यांनी केला. जातीय समीकरणे गेहलोत यांच्‍या पथ्‍यावर पडली. गेहलोत यांना पराभूत करण्‍यासाठी भाजपने त्‍यांचेच मित्र शंभूसिंह खेतासर यांना उभे केले होते. शंभूसिंह यांना येथून निवडणूक लढवायची नव्‍हती. परंतु, परंपरागत मते घेण्‍यासाठी शंभूसिंह यांना येथून रणांगणात उतरवण्‍यात आल होते.