आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISचा प्रोपोगंडा करत होता इंडियन ऑइलचा मॅनेजर, जयपूरमधून अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरमधील जवाहर एनक्लेव्ह. याचठिकाणी असलेल्या फ्लॅटमधून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. - Divya Marathi
जयपूरमधील जवाहर एनक्लेव्ह. याचठिकाणी असलेल्या फ्लॅटमधून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
जयपूर - राजस्थानच्या एटीएस पथकाने दहशतवादी संघटना आयएसआयएसचा एजंट मोहंमद सिराजुद्दीन याला अटक केली. तो कर्नाटकचा राहणारा आहे. एटीएसने त्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिली असून त्याच्याविरोधात देशद्रोही कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. सिराजुद्दीन हा आयएससाठी इंटरनेट व सोशली मीडियाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करत होता. त्याच्याकडून आयएसचे ऑनलाइन मासिक दाबिकचे अनेक अंक जप्त करण्यात आले आहेत.

राजस्थानात अलर्ट
- सिराजुद्दीन याच्या अटकेनंतर राजस्थान पोलिसांनी सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधिक्षक आणि रेंज आयजी यांना अलर्ट जारी केला आहे.
- चार महिन्यांपूर्वीच सिराजने पत्नी आणि मुलांना बेंगळुरूला पाठवले होते. तो गेल्या दीड वर्षापासून येथे राहत होता.
- जवाहर एन्क्लेव्हच्या सुमारे 100 फ्लॅट्समध्ये अनेक कंपन्यांचे कर्मचारी राहतात. त्यात आयओसीचे कर्मचारीही आहेत.

सोशल मीडियाद्वारे नेटवर्किंग
- सिराजला जवाहर एन्क्लेव्हमधील फ्लॅट क्रमांक बी-605 मधून अटक करण्यात आली. एटीएस त्याच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून डाटा रिकव्हर करण्याच्या प्रयत्नात आहे.
- पोलिस सुत्रांच्या मते तो व्हॉट्सअप आणि फेसबूकसारख्या सोशल साइट्सवर अॅक्टीव्ह होता.
- त्याला राजस्थानात ISIS चे नेटवर्क पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 15 दिवसांपूर्वी त्याच्या विरोधात पहिली तक्रार मिळाली होती.
- त्यानो सोशल मीडियावर अनेक ग्रुप तयार केले होते. अनेक मुला मुलींना तो ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी प्रलोभने देत होता.
- त्याच्या रूममधून ISIS चे ऑनलाइन मॅगझिन 'दाबिक' च्या काही कॉपीही जप्त करण्यात आल्या आहेत.
- IS च्या प्रसारासाठी तो अनेकदा अजमेरलाही गेला होता.
मूळचा कर्नाटकचा...
सिराजुद्दीन हा कर्नाटकचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब बेंगळुरूमध्ये राहते. 15 दिवसांपूर्वी मिळालेल्या एका टिपनंतर एटीएसने त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर संशय बळावल्यानंतर अटक करण्यात आली. त्याचे मुस्लीम देशांतील सुमारे 80 पेक्षा अधिक लोकांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. संशयिताचा लॅपटॉप, मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. तो बऱ्याच दिवसांपासून ISISशी संलग्न होता. जयपूरला आल्यानंतर तो अधिक सक्रिय झाला होता. ISIS चा कँपेनर म्हणून सिराजुद्दीचा अजमेरमध्येही काही जणांशी संपर्क असल्याची माहिती मिळाली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा ISIS चे साऊथ कनेक्शन.... आतापर्यंत 23 भारतीय गेले आहेत या दहशतवादी संघटनेत....