आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Election: Voting Begins To Decide The Fate Of 2087 Candidates

अलवार, दौसा, भरतपूरमध्ये गोळीबारानंतरही राजस्थानमध्ये 74.38 टक्के मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानच्या दोनशे विधानसभा जागांपैकी 199 मतदारसंघात विक्रमी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता संपूर्ण राज्यात 74.38 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत राज्यात 66.41 टक्के मतदान झाले होते, तर 2003 मध्ये 67.04 टक्के मतदान झाले होते.
निवडणूक आयोगाने किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडल्याचा दावा केला आहे. राजस्थानमध्ये 200 जागांसाठी 2096 उमेदवार रिंगणात होते. त्यांचे भविष्य आज इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद झाले आहे. इव्हिएम मशिन्स जिल्हाच्या स्ट्राँगरुमध्ये बंद करण्यात आल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष 8 डिसेंबर रोजी होणा-या मतमोजणीकडे लागले आहे.
तीन ठिकाणी गोळीबार
दौसा जिल्ह्यातील महवा येथेली औण मीणा गावात मतदान केंद्र ताब्यात घेण्यासाठी आलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दौसा येथेच मतदान केंद्राजवळ गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. तसेच , अलवार आणि भरतपूर् येथेही गोळीबाराची घ़टना घडली.
मतदानावर बहिष्कार
झालावाड येथील मालीखेडा गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
काँग्रेसचा आरोप
भरतपूर जिल्ह्यातील नगर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अनिता सिंह तसेच सवाईमाधोपूर येथील राजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
जोधपूर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी संपूर्ण कुटुंबासह जोधपूर येथे मतदान केले.

200 जागांसाठी 2087 उमेदवार रिंगणात आहेत. त्‍यापैकी भाजपचे 200, कॉंग्रेसचे 200, बहुजन समाज पक्षाचे 195, सीपीएमचे 38, सीपीआयचे 23, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे 16 , इतर पक्षाचे 666 आणि 748 अपक्ष उमेदवार उभे आहेत.