आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Fort Without Base And Pillars, Rajput Women Committed Johar

पाया, पिलर्स न उभारता केले या किल्ल्याचे बांधकाम, हजारो महिलांनी मृत्यूला कवटाळले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(19 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत वर्ल्ड हेरिटेज वीक साजरा केला जात आहे. या निमित्त आम्ही तुम्हाला राजस्थानमधील गागरोन किल्ल्याची माहिती देणार आहोत. हा किल्ला महिलांच्या बलिदानामुळे प्रसिद्धीस आला आहे.)
कोटा- या किल्ल्याचे नाव आहे गागरोन. राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात असलेला हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढला आहे. एवढेच नव्हे तर पाया किंवा पिलर्स न उभारता बांधकाम केलेला हा भारतातील एकमेव किल्ला आहे. या शानदार किल्ल्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत स्थान दिले आहे.
शतकांपूर्वी राजा अचलदास खींची यांच्या ताब्यात हा किल्ला होता. तेव्हा संपन्नता आणि समृद्धीसाठी हा किल्ला प्रसिद्ध होता. तेव्हा मालवाचा शासक सुल्तान होशंगशाह याची या किल्ल्यावर आणि येथील संपत्तीवर नजर होती. 1423 मध्ये त्याने 30 हजार घोडेस्वार, 84 हत्ती आणि हजारो पैदल सैन्यासह किल्लाला वेढा दिला. यावेळी श्रीमंत राव आणि राजाही त्याच्यासोबत होते. त्याच्यासमोर खींची सत्ता टिकू शकली नाही. राजा शहीद झाले. तेव्हा या किल्ल्यातील शेकडो राजपूत महिलांनी जौहर केला होता. शेकडो महिलांनी आपली आब्रू न गमावता मृत्यूला कवटाळले होते. (जौहर म्हणजे किल्ल्यात एक विशाल होळी पेटवून त्यात महिला उडी मारुन जीव देत असत.)
या किल्ल्याची आहेत अनेक वैशिष्ट्ये
गागरोन किल्ल्याचे बांधकाम डोड राजा बीजलदेव यांनी 12 व्या शतकात केले होते. 300 वर्षांपर्यंत खींची शासकांच्या ताब्यात हा किल्ला होता. येथे 14 युद्धे आणि 2 जौहार झाले. चारही बाजूंनी पाण्याने वेढला असल्याने याला जलदुर्गही म्हटले जाते. या किल्ल्यात तीन परकोट आहेत. सामान्यपणे किल्ल्यात दोन परकोट असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या शानदार किल्ल्याचे जानदार फोटो....