जयपूर - राजस्थानात अंगठेबहाद्दर उमेदवारांना ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार नाहीत. येथील राज्य सरकारने पंचायती राज निवडणुका लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेसंबंधी राजस्थान पंचायती राज (द्वितीय दुरुस्ती) वटहुकूम २०१४ लागू केला आहे. राज्यपाल कल्याणसिंह यांनी शनिवारी त्याला मंजुरी दिली. राजस्थानात पुढील वर्षी जानेवारीत ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत.
अशा अटी...
1 ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार किमान आठवी पास असणे बंधनकारक आहे. अनुसूचित प्रवर्गातील ग्रामपंचायत उमेदवारासाठी ही अट पाचवी पासपर्यंत शिथिल आहे.
2 स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार किमान दहावी पास असावा. या निर्णयामुळे अल्पशिक्षित उमेदवारांचा निवडणुकीतून पत्ता कट हाेणार अाहे.