आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली ते १२ पर्यंतच्या पुस्तकांचे डिजिटायझेशन, राजस्‍थान सरकारचा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - आता राजस्थानात इयत्ता १ ते १२ पर्यंतच्या पुस्तकांचेही डिजिटलायझेशन केले जात आहे. यानंतर राजस्थानातील ७८ लाख विद्यार्थी मोबाइलवरही आपली पाठ्यपुस्तकासह देशाच्या अन्य राज्यातील क्रमिक पुस्तकेदेखील वाचू शकतील.
 
राष्ट्रीय शेैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण संस्था (एनसीईआरटी) च्या ई-पाठशाळा मोबाइल अॅप्लिकेशनवर एप्रिल महिन्यापर्यंत देशातील सर्व बोर्डांत अभ्यासक्रमात असलेली पुस्तके अपलोड करण्यात येतील. राजस्थानात प्रारंभिक शिक्षणाची ३६ हिंदीची आणि १७ इंग्रजी माध्यमाची पाठ्यपुस्तके आणि माध्यमिक शिक्षणाची पाठ्यपुस्तके यावर अपलोड केली जातील. यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळ आणि एसआयईआरटी पुस्तकांना डिजिटल स्वरूपात बनविण्याची तयारीला लागले आहे.    

एनसीईआरटीच्या या अॅप्लिकेशनमध्ये अधिकांश राज्यात पुस्तके अपलोड करणे सुरू केले आहे. आतापर्यंत या अॅप्लिकेशनला ६ लाख मुलांनी डाऊनलोड केले आहे. आणि साधारणत: १ कोटी लोक यास पाहिले आहे. यासह या अॅप्लिकेशनमध्ये १५ भाषांमध्ये ३७० पाठ्यपुस्तकांना टाकण्यात आले आहे. ३१ मार्चनंतर देशभरात सर्व पुस्तके अॅपवर अपलोड करण्याचे लक्ष्य आहे.  
 
गेल्या काही दिवसांत अॅप्लिकेशनसाठी एनसीईआरटी राजस्थानच्या २० मास्टर ट्रेनरांना प्रशिक्षण दिलेले आहे. आता हे मास्टर ट्रेनर्स राज्यातील इतर शिक्षकांनाही या अॅप्लिकेशनसाठी प्रशिक्षण देतील. लवकरच या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाईल. एसआयईआरटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या राज्यांतील पुस्तके वर्ड फाइलमध्ये आणि राजस्थानची पुस्तके कोरलवर बनवली जाताहेत. ज्यांना डिजिटल करणे कठीण आहे. 
यासंबंधीच प्रशिक्षण लवकरच घेतले जाईल.  
बातम्या आणखी आहेत...