आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांच्या नवकल्पनांना राजस्थान सरकारची साथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - आर्थिक विवंचनांमुळे युवकांच्या अनेक कल्पना वास्तवात उतरतच नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना सुरू करत या युवकांच्या कल्पनेला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार्टअप व्हिलेज या योजनेच्या माध्यमातून मेडिकल, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, वित्त पुरवठा आणि उद्योग उभारणीबाबत युवकांच्या कल्पना जाणून घेत त्या सत्त्यात उतरवल्या जाणार आहेत.
विज्ञान आणि तंत्र विभागाचे सचिव रविशंकर श्रीवास्तव म्हणाले, युवकांच्या अशा कल्पनांना वास्तवात उतरवण्यासाठी धडपडणे राज्याच्या प्रगतीसाठी हातभार लावणारे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच टेक्नॉलॉजी स्टार्टअप पॉलिसी बनवली जात आहे. या योजनेत आयटी, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, उद्योगांचा विस्तार, वित्त पुरवठा आदी कल्पनांना प्राधान्य दिले जाणार आहे.
व्यवसाय उभारणीसाठी मिळेल पाच कोटींचे कर्ज
जयपूर | आधीच्या गहलोत सरकारने तयार केलेली युवा उद्यमिता योजना थोडाफार बदल करत विद्यमान सरकारने सुरू केली आहे. आधीची योजना अयशस्वी ठरली होती, तरीही सध्याच्या सरकारने काही सुधारणा करत ही योजना सुरू करण्याचे सूतोवाच अर्थसंकल्पात केले होते. संशोधनाअंती ही योजना राबवली जात आहे.

उद्योजकांना ९० लाखांऐवजी पाच कोटींचे कर्ज देण्याचा निर्णय हा सर्वात मोठा बदल सरकारने केला आहे. मात्र, नव्याने सुरू करावयाच्या प्रोजेक्टची माहिती शासनाला सादर करण्यापूर्वी या उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी जागेचा शोध घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन नियमांची पूर्तता करणाऱ्या उद्योजकांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे.
गुंतवणूक वाढणार
युवकांच्या कल्पना जाणून घेतल्यानंतर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ या कल्पना कितपत व्यावहारिक आहेत, हे तपासतील. बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारी कल्पना असेल तरच त्यावर पुढे काम केले जाईल. या योजनेमुळे राज्यात १० हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या येाजनेमुळे उद्योगांना तर फायदा होईलच. शिवाय योजना मांडणाऱ्या युवकांना लाभ होईल आणि रोजगार निर्मितीही होईल.