आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधराराजेंच्या राज्यात परिवर्तनाचे ‘असेही वारे ’, 25 मिनिटांत राजीव गांधींचा फोटो उतरवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - सरकार बदलले की राज्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागते. राजस्थानात याचा वेगळ्या अर्थाने प्रत्यय आला. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड रविवारी दुपारी 12.25 वाजता जयपूरच्या आरोग्य भवनात पोहोचले. तेथील अधिकाºयांनी त्यांना नव्याने सजवलेल्या कार्यालयात नेले. कार्यालयात मंत्र्यांच्या खुर्चीच्या समोरच्या बाजूला भिंतीवर माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राजीव गांधी यांचे छायाचित्र लावले होते. त्या वेळी राठोड यांनी जोर देत म्हटले, येथे अजूनही बºयाच वस्तू अशा आहेत, ज्यांना बदलायला हवे. अधिकाºयांशी बोलताना भिंतीकडे पाहत त्यांनी हे विधान दोन-तीन वेळा केले. 12.44 मिनिटांनी राठोड इतर अधिकाºयांसमवेत दुसºया कार्यालयात निघून गेले. जाता जाता एका अधिकाºयाने कर्मचाºयाला काहीतरी सांगितले आणि 12.57 मिनिटांनी राजीव गांधींचे छायाचित्र भिंतीवरून हटवण्यात आले. छाया : राजेश कुमावत
मी छायाचित्र हटवण्यास सांगितले नव्हते. त्या ठिकाणी राजीव गांधी यांच्यासोबत सर्व माजी पंतप्रधानांची छायाचित्रे लावाव्यात, अशी माझी इच्छा आहे.
राजेंद्र राठोड, आरोग्यमंत्री