आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक लाख जमा करा, तरच जोडे परत'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाली - विवाहसोहळ्यात नवरोबाचे जोडे लपवणे त्याच्या बदल्यास पैसे मागणे हे तर नेहमीचेच. पण राजस्थानच्या एका गावात पंचांनी एका व्यक्तीचे जोडे ठेवून घेतले. जोड्यांच्या बदल्यात त्याला एक लाख रुपये मागितले जात आहे. साक्षात कायदाही त्याचे जोडे परत मिळवून देण्यात अपयशी ठरत आहे.

पाली जिल्ह्यातील मालपुरिया खुर्द गावातील भिखाराम गुर्जर यांच्या खेटरांची किंमत तशी २०० रुपयेही नाही. मात्र, जात पंचांनी या जोड्यांची किंमत एक लाख रुपये लावली आहे. ती दिल्याशिवाय त्यांना जोडे परत मिळणार नाही. त्यांना नवीन जोडेही विकत घेण्याची परवानगी नाही. भिखाराम यांचा गुन्हा इतकाच की त्यांनी पंचांच्या सहमतीविना आपल्या पुतणीचे दुसरे लग्न लावून दिले. त्यावर नाराज झालेल्या पंचांनी जात पंचायत बोलावली भिखाराम यांना जोडे उतरवण्याचे फर्मान बजावून समाजातून वाळीत टाकले.
भिखाराम यांना गावातील कोणत्याही कार्यक्रमात येऊ दिले जात नाही. काही दिवस त्यांनी पंचांचा राग शांत होण्याची वाट पाहिली. शेवटी नाईलाजाने ते कायद्याला शरण गेले.
अशी फर्माने नेहमीचीच
बाजारातभलेही पगडी जोड्याची किंमत दोन-तीनशे रुपये असेल. पण जात पंचायतींत दंडाची रक्कम लाखो रुपयांत लावली जाते. जोडे आणि पगडी काढून घेणे हे एखाद्या कुटुंबाची इज्जत उतरवण्यासारखे असते. त्याला समाजात वावरू दिले जात नाही. दंडाची रक्कम मिळाल्यानंतरच मुख्य प्रवाहात सहभागी होता येते. आजही मोठ्या प्रमाणात अशी फर्माने निमूटपणे मान्य केली जातात.
बातम्या आणखी आहेत...