आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाय टार्गेट एरियामध्ये भिंत करण्यामागे पाकच्या कुरापती, सीमेवर ३८ किमी लांब भिंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर(राजस्थान) - २१० किमी सीमाक्षेत्राला लागून असलेला श्रीगंगानगर जिल्हा सामरिक दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. येथील सीमेसमोर पािकस्तानकडून बनवण्यात आलेली मड वॉल (मातीची भिंत) तस्करांसाठी सोयीची झाली आहे. सीमाक्षेत्रात पािकस्तानकडून तीन वेळेस हेरॉइन आले आहे. गुप्तचर संस्था बीएसएफ अिधकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या मातीच्या िभंतीआडून पंजाब श्रीगंगानगरमध्ये आंतरराष्ट्रीय तस्करी होते. िभंतीपलीकडे भारतविरोधी कारवाया रचल्या जातात. घुसखोरी केली जाते.
युद्ध आिण सामरिक हालचाली दिसू नये हा उंच िभंत तयार करण्यामागचा उद्देश आहे.

काय आहे मड वॉल
मातीपासूनबनवलेली जवळपास ३८ िकमी लांब िभंत पािकस्तानच्या सुलेमानकी हेडपासून(फािजल्कासमोर) सुरू होऊन तंजानापर्यंत(क्यू हेडसमोर) आहे. त्याची उंची २० फूट आिण रुंदी ते १० फूट आहे. त्याच्या पाठीमागे जवळपास ४० फूट रुंद कालवा वाहतो. िभंतीचे बांधकाम ऑपरेशन पराक्रमवेळी सन २००० मध्ये झाले होते.