आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीला घर बांधून देण्यासाठी चोरीचा बनाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा (राजस्थान) - प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत येथील एका तरुणाने प्रेयसीचे घर बनवण्यासाठी २२.५० लाख रुपयांची चोरी झाल्याचा बनाव करून पैसै हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पोलिसांनी केवळ सहा तासांत उघडकीस आणला. ही घटना सोमवारी उजेडात आली.

पोलिसांना बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याच्या अकाउंटंटने चोरी झाल्याचा हा दावा केला होता. ज्ञानचंद जैन असे या आरोपीचे नाव आहे. आपण दोन बँकांतून २२.५० लाख रुपये काढले होते. त्यात २२.३५ लाख रुपये तीन चोरट्यांनी लुटले. िपस्तूल दाखवून ही लूट करण्यात आल्याचा दावा त्याने केला होता. धाक दाखवून लूट झाल्याचे त्याचे म्हणणे होते. मात्र पोलिसांना संशय आला. त्यावर पोलिसांनी त्याला थर्ड डिग्री दाखवली. त्यानंतर मात्र त्याने सत्य सांगितले. प्रेयसीचे घर बांधण्यासाठी आपण हा बनाव केल्याचे त्याने कबूल केले.