आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Student Gets Pregnant After Gang Rape By Teachers, Case Registered In Ajeetgarh Police Station

संस्थाचालकासह शिक्षकाने केला विद्यार्थीनीवर बलात्कार, प्रेग्नेंट झाल्यावर केले अबॉर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर (राजस्थान) - राजस्थानमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थीनीवर गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. आरोप आहे की शाळेचे संस्थाचालक आणि एका शिक्षकाने एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने बोलावून मुलीवर दोन महिने अत्याचार केले. जेव्हा मुलगी प्रेग्नेंट राहिली तेव्हा डॉक्टरांसोबत सेटिंग करुन तिचे अबॉर्शन करण्यात आले. पीडितेच्या भावाने अजीतगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. दोन्ही आरोपी फरार असून मुलीला या सर्व प्रकाराने धक्का बसला आहे. तिच्यावर जयपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी 12वीच्या वर्गात शिकत आहे. आरोपी शिक्षक एक्स्ट्रा क्लास घेण्याच्या बहाण्याने तिला शाळेत बोलावून घ्यायचा आणि संस्थाचालकासह तिच्यावर गँगरेप करायचा. असे जवळपास दोन महिने सुरु होते. या घटनेनंतर मुलगी गुमसूम राहायला लागली होती. त्यानंतर 20 ऑगस्टपासून तिने शाळेत जाणे सोडून दिले होते. 
- मुलीचा भाऊ देखील याच शाळेत आहे. आरोपी शिक्षकाने त्याला विचारले की तुझी बहिण शाळेत का येत नाही. त्यानंतर मुलीने आईला सांगितले की तिच्या पोटात दुखत आहे. 
 
डॉक्टरने ऑपरेशनच्या नावाने केले अबॉर्शन 
- 25 ऑगस्ट रोजी मुलीला घेऊन तिची आई आणि मोठा भाऊ हॉस्पिटलमध्ये पोहोचले. याची माहिती मिळताच आरोपी शिक्षक आणि संस्थाचालक तिथे हजर झाले. त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना फूस लावून आपल्या ओळखीच्या डॉक्टरकडे नेले. संस्थाचालकाने डॉक्टरला आधीच सांगून ठेवले होते की अबॉर्शन करायचे आहे. त्यानुसार त्याने काम केले. 
- पीडित कुटुंबाचा आरोप आहे की डॉक्टरने मुलीच्या कुटुंबियांना सांगितले की तिच्या पोटात गंभीर आजार आहे, ऑपरेशन करावे लागेल. घाबरलेल्या आईने लागलीच सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या. त्यानंतर संस्थाचालकाच्या सांगण्यावरुन डॉक्टरने मुलीचे अबॉर्शन केले. 
- डॉक्टरकडून सुटी मिळाल्यानंतर मुलगी घरी गेली. मात्र 4 सप्टेंबरला तिची प्रकृती बिघडली. जेव्हा आई आणि भाऊ तिला हॉस्पिटलला घेऊन निघाले तेव्हा रस्त्याने तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. सध्या मुलीला जयपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलीला मोठा मानसिक धक्का बसला असून तिची प्रकृती सुधारण्याची वाट पाहिली जात आहे. 
 
पोलिस काय म्हणाले 
- अजीतगड ठाणे अंमलदार मंगलाराम ओला यांनी सांगितले की रविववारी रात्री मुलीचा भाऊ तक्रार देण्यासाठी आला. मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार संस्थाचालक जगदीश यादव आणि शिक्षक जगतसिंह गुजर यांच्यावर गँगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
- तपासात समोर आले की आरोपींनी डॉक्टरसोबत सेटिंग करुन मुलीला व तिच्या कुटुंबियांना न सांगता तिचे अबॉर्शन केले. 
- तक्रार देण्यास उशिर झाला कारण मुलीच्या उपचारासाठी तिचे कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये होते. 
- आरोपींवर सध्या 376, 313, 201, 120 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींचा शोध सुरु असून पोलिसांनी तीन पथक तयार केले असून ते छापेमारी करत आहेत. 
- पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...