आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी पर्यटकांचे लक्ष वेधू शकली नाही ही शाही ट्रेन; बघा, ‘रॉयल राजस्थान ऑन व्हील्स’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- चार वर्षांपासून ट्रॅकवर धावणारी ‘रॉयल राजस्थान ऑन व्हील्स’ या सुपर शाही ट्रेनने विदेशी पर्यटकांना नाराज केले आहे. 16 कोरियन पर्यटक रविवारी दिल्लीहून सात दिवसांच्या प्रवासाला निघाले होते. मात्र, रेल्वेत झालेल्या असुविधेमुळे सर्व कोरियन पर्यटनांनी अर्ध्यातच प्रवास सोडला. सर्व कोरियन पर्यटक बुधवारी जयपूर स्थानकावर उतरले.

‘रॉयल राजस्थान ऑन व्हील्स’चा प्रवास सहा नाइट्सचा होता. मात्र, तीन नाइट्‍सनंतर विदेशी पर्यटकांनी प्रवास अर्धातच सोडला. जयपूरमध्ये उतरलेल्या पर्यटकांची व्यवस्था फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. कोरियन पर्यटकांचा उर्वरित प्रवास पूर्ण करण्यासाठी आता एजेंट्‍स कामाला लागले आहेत.

या शाही थाटामुळे प्रसिद्ध...
23 कोच असलेल्या या शाही रेल्वेमध्ये 14 सलून, एक स्पा, दोन महाराजा & महाराणी रेस्टरॉ तसेच एक रिसेप्शन कम बार कोचचा समावेश आहे. सुविधेनुसार कोचला नाव देण्यात आले आहे. काही कोचला 'शीश महल' तर काहींना 'ताज महल' असे नामकरण करण्यात आले आहे. यात 104 पर्यटक राजेशाही अंदाजात प्रवास करू शकतात. ही शाही रेल्वे सात दिवसांत राजस्थानातील प्रमुख पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देते. तसेच पर्यटकांना जगप्रसिद्ध आग्रा येथील 'ताजमहल' फिरवून आणते.

सुविधा...
> सर्व कोचचे इंटेरिअर महलाप्रमाणे करण्यात आले आहे.
> ट्रेनमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडेड स्प्राइट्स आणि वाईनची सुविधा आहे.
> ट्रेनमध्ये महाराजा आत्रर महाराणी असे दोन रेस्तरॉ
> पर्यटकांसाठी भारतीय व्यजंनासह यूरोपीय, चीनी, आणि सागरी किनार्‍यावरील व्यजंने उपलब्ध असतात.

कोरियातील टॉप सीईओ ‘रॉयल राजस्थान ऑन व्हील्स’वर नाराज...
दिल्लीतून रविवारी निघालेल्या ‘रॉयल राजस्थान ऑन व्हील्स’ या शाही रेल्वेत एकूण 43 पर्यटक होते. यात कोरियातील विविध कंपन्यांचे सीईओ होते. सोमवारी जोधपूर, मंगळवारी उदयपूर-चित्तौडगड, बुधवारी जयपूर, गुरुवारी खजुराहो, शुक्रवारी वाराणसी, शनिवारी आग्रा आणि रविवारी पुन्हा दिल्लीला ही रेल्वे पोहोचते. शाही रेल्वेचे भाडे प्रति व्यक्ती, प्रति रात्र 40 हजार रुपये (625 डॉलर्स)

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, ‘रॉयल राजस्थान ऑन व्हील्स’चा शाही थाट...