आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS रणरणत्या उन्हातही फोटोग्राफरने दाखवले राजस्थानातील सुंदर LIFE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - दिल्लीच्या बिकानेर हाऊसमध्ये सुरू असलेल्या एका फोटो एक्झिबिशनमध्ये फोटोग्राफर सुधीर कासलीवाल यांनी राजस्थानातील विविध रंग कॅमेऱ्यात टिपले आहेत. वंडर लँड्स या त्यांच्या प्रोजेक्ट अंतर्गत ते राजस्थानातील सौंदर्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रदर्शन 10 ते 17 एप्रिल पर्यंत चालणार आहे.

राजवाडे सोडून टिपले वाळवंट
- फोटोग्राफर सुधीर हे मूळचे जयपूरचेच रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांची राजस्थानकडे चांगलीच ओढ आहे.
- ते गेल्या 50 वर्षांपासून फोटोग्राफी करत आहेत. या एक्झिबिशनसाठी त्यांनी आजवर समोर न आलेल्या राजस्थानातील अनेक ठिकाणांना भेट दिली.
- त्यांनी वाळवंटाचा कोपरान कोपरा कॅमेऱ्याच्या नजरेतून टिपण्याबरोबरच विविध प्रकारच्या संस्कृतीही समोर आणल्या आहेत.
- एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, राजवाडे आणि वास्तूंचा त्यांना अभिमान आहेच पण त्यांना राजस्थानातील गावे आणि मेळ्याचे कल्चर दाखवायचे होते.
- त्याचबरोबर त्यांनी एवढ्या रणरणत्या उन्हातही महिला कसे त्यांचे काम करतात हेही दाखवले आहे.

अनेक पुरस्कार मिळवले
- सुधीर यांनी 1993 मध्ये युनेस्कोने घेतलेल्या वर्ल्ड फोटोग्राफी कॉन्टेस्टमध्ये पुरस्कार मिळवला आहे.
- 2009 मध्ये त्यांना जयपूर ज्वेलरी शोमध्ये राजमाता गायत्री देवी यांचे 255 रेयर फोटो शोकेस केल्याबद्दल गौरवण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा. रणरणत्या वाळवंटातील राजस्थानच्या Life चे फोटो...