आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Udaipur Road Rahul Gandhi Ashok Gehlot Spg Banswara

राहुल गांधींनी वाजवला निवडणुकीचा बिगुल, दलित-आदिवासींची पुन्हा आठवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - आदिवासी आणि शेतकरी मेळाव्यासाठी सलंबूर येथे आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. खासदार रघु मीणा यांनी मेवाडी पगडी आणि खासदार ताराचंद भगोडा यांनी धनुष्य देऊन राहुल यांचे स्वागत केले. यावेळी मंचावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, केंद्री मंत्री गिरीजा व्यास, सचिन पायलट, सी.पी.जोशी उपस्थित होते.

ग्रामीण रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा कायदा काँग्रेसने आणला आहे, असे सांगत राहुल यांनी तीन-चार रोटिंया खाएंगे, काँग्रेस पार्टी को लाएंगे ही नवी घोषणा दिली. मुख्यमंत्री गहलोत यांच्या कार्याचे कौतूक करताना ते म्हणाले, की राज्य सरकारने गरीबांसाठी अनेक कामे केली आहेत. राज्यातील गरीबी कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

भारत विविध फुलांच्या गुच्छ असल्याचे सांगत राहुल यांनी तुमची स्वप्न मला माझी करायची आहेत. देशातील लोक उपाशी राहून देशाची प्रगती होत नाही. त्यासाठी अन्न सुरक्षा कायदा आणला आहे. विरोधकांचे नाव न घेता ते म्हणाले, विरोधकांना माहित आहे की काँग्रेसच्या योजना देशाला पुढे घेऊन जातील आणि त्यांना ते नको आहे.