आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Women Wont Be Seen Carrying Water Pots

मडके-घागरीतून पाणी आणण्याची प्रथा संपणार, महिलांना मिळणार वॉटर बॅग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाडमेर- बाडमेरमध्ये महिला खांद्यावरून पाणी बॅग आणत असल्याचे चित्र लवकरच दिसणार आहे. पाण्याने भरलेल्या पिशव्या स्कूल बॅग किंवा ऑफिस बॅगसारख्या खांद्यावर टाकता येणार आहेत.

विदेशी बाल्मर वाहन कंपनी बाडमेर जिल्ह्यामध्ये वॉटर बॅग पुरवणार आहे. परदेशामध्ये अशा पद्धतीच्या बॅगचा वापर याआधीपासूनच झाला आहे. पहिल्या टप्प्यात वॉटर बॅग योजनेसाठी बाडमेरची निवड केली आहे. सहा रुपये किमतीच्या या पिशव्या महिलांना मोफत वाटण्यात येतील. दुसर्‍या टप्प्यात मागणीनुसार बॅग वाटपाची योजना आखली जाईल. संपूर्ण जिल्ह्यात वाटप झाल्यानंतर राज्याच्या अन्य जिल्ह्यात वॉटर बॅग योजना लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

त्रासातून सुटका

ग्रामीण भागातील महिलांना लांबच्या विहिरीतून मडके किंवा घागरीतून पाणी आणावे लागते. डोक्यावर ओझे लादल्याने मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. यामुळे महिलांना कंबरदुखी, मणक्याच्या हाडासंबंधी अनेक आजार बळावतात. नव्या पर्यायामुळे महिलांची या त्रासातून सुटका होईल. ’’
आर. के. माहेश्वरी, माजी पीएमओ, बाडमेर