आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या यंगेस्ट PM चे हे 10 PHOTOS, कठीण आहे इंटरनेटवर मिळणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - 20 ऑगस्टला देशाचे यंगेस्ट माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची जयंती होती. ते अमेठीतून खासदारही होते. यानिमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना त्यांचे अमेठीशी निगडित काही किस्से आणि फोटोज शेअर करत आहे. 
 
नमाज अदा करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी 20 मिनिटे प्रतीक्षा केली
- सोनिया गांधी यांचे प्रतिनिधी किशोरी लाल शर्मा सांगतात, 23 एप्रिल 1991 रोजी राजीव गांधी अमेठीच्या दौऱ्यावर आले होते. मी त्यांना सांगितले की, अमेठीचे रहिवासी कार्यकर्ता हाजी नजीर यांची तब्येत ठीक नाहीये. ते लगेच त्यांची चौकशी करायला त्यांच्या घरी गेले. तिथे पोहोचताच कळले की, नजीर नमाज अदा करत आहेत. बिझी असूनही त्यांनी 20 मिनिटे त्यांची प्रतीक्षा केली. आणि नजीर यांची ख्याली-खुशाली विचारूनच निघाले.

विनोदही करायचे राजीव
- सेन्सॉर बोर्डाचे माजी चेअरमन विजय श्रीवास्तव सांगतात, राजीव गांधी गौरीगंजच्या दरपीपूरमध्ये काँग्रेस वर्कर्सच्या मीटिंगमध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री पी.के. शर्मा सामील झाले होते. त्या वेळी राजीव गांधी यांच्या स्वागतासाठी एक गीत सुरू होते. 'नीले गगन के तले, धरती का प्यार पले' यावर राजीव गायला लागले- 'नील गगन के तले, शर्मा पी. के. पडे'. त्यांनी असे म्हणताच शर्मा हैराण झाले आणि स्पष्टीकरण द्यायला लागले. तेव्हा राजीव म्हणाले - मी काहीच म्हणत नाहीये. फक्त एवढीच गोष्ट आहे की, टेलिफोन डिरेक्टरीमध्ये सरनेम आधी असते आणि नेम नंतर. तेव्हा कुठे पी.के.शर्मा यांच्या जिवात जीव आला.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, राजीव गांधी यांचे दुर्मिळ PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...