आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनी म्हणाले, माझ्यामुळे झाला होता जयललितांचा पराभव, साजरा करणार नाही वाढदिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - रजनीकांत यांनी म्हटले आहे की, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता त्यांच्यामुळे 1996 ला निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यावेळी रजनी यांनी जयललितांच्या राजकारणावर टीका केली होती. साऊथ इंडियन आर्टिस्ट्स असोसिएशनच्या शोकसबेत ते म्हणाले, माझ्या टीकेमुळे त्यांना वेदना झाल्या होत्या. 5 डिसेंबरला जयललिता यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

रजनीकांत म्हणाले होते, जयललिता जिंकल्या तर तामिळनाडूला देवही वाचवू शकणार नाही
- 20 वर्षांपूर्वी रजनीकांत यांनी जयललिता यांच्याबाबत वक्तव्य केले होते.
- त्यावेळी रजनीकांत यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत होते. ते म्हणाले होते, जर जयललिता पुन्हा सत्तेत आल्या तर तामिळनाडूला कोणीही वाचवू शकणार नाही.
- रजनीकांत यांनी आठवणींना उजाळा देताना म्हटले की, फारसे चांगले संबंध नसतानाही त्या जेव्हा माझ्या मुलीच्या लग्नात आल्या तेव्हा मला खूप आनंद झाला होता, असे ते म्हणाले.
- मला वाटले होते त्या येणार नाही. पण त्या आल्या. त्या कोहिनूरसारख्या चमकत होत्या.. अशा शब्दांत रजनी यांनी त्यांच्या भावना मांडल्या.

रजनीकांत साजरा करणार नाही बर्थडे
- तामिळनाडूत जयललिता यांच्या निधनाने दुःखाचे वातावरण आहे. त्यामुळे रजनीकांत यांनीही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- काही दिवसांपूर्वी त्यांनी चाहत्यांना वाढदिवसाच्या दिवशी कोणतेही बॅनर पोस्टर लावू नका असे म्हटले होते. रजनीकांत आता 66 वर्षांचे झाले आहेत.

जयललितांना श्रद्धांजली द्यायला गेले होते, रजनीकात
- जयललितांच्या अखेरच्या काही दिवसांत रजनीकांत अनेकदा त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते.
- जयललितांच्या निधनानंतर ट्विटरवर त्यांनी देशाने एक वीरकन्या गमावली अशा आशयाचे ट्विट केले होते.
- 6 डिसेंबरला राजाजी हॉल येथे जयललितांना श्रद्धांजली द्यायलाही ते गेले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, काही संबंधित PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...