आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी गाड्यावर ऑमलेट विकत होता हा \'राजकुमार\'; असे बदलले भाग्य...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार सावलानी... - Divya Marathi
राजकुमार सावलानी...
जयपूर - शहरातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक राजकुमार सावलानीची पत्नी शुभांगना राज सावलानी हिने आत्महत्या केली. शुभांगना आणि राजकुमार यांच्या लव्ह मॅरेज झाले होते. विशेष म्हणजे, एक-एक कोटींच्या आलीशान कार वापरणारा हा अब्जाधीश उद्योजक एकेकाळी गाडा लावून ऑमलेट विकत होता.
 

असा बनला आघाडीचा उद्योजक
- शुभांगना राज हिचा पती राजकुमार सध्या चायनीज माल आयात करतो. तर, शुभांगना महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांची चेअरमन होती. 
- लग्नापूर्वी राजकुमार गाडा लावून अंडे आणि ऑमलेट विकत होता. यानंतर एमआय रोडवर त्याने कॅसेटचे दुकान लावले. 
- तर लग्नापूर्वी शुभांगनाचे नाव रूचिरा सुराणा असे होते. एमआय रोडवर शुभांगनाच्या वडिलांचे कार्यालय होते. तिला गाणे ऐकण्याचा खूप छंद होता. याचवेळी कॅसेटच्या दुकानावर तिची राजकुमारशी भेट झाली. 
- राजकुमार आणि शुभांगना यांची मैत्री काही दिवसांतच प्रेमात बदलली आणि शुभांगनाचे वडिलांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी विवाह केला. 
- राजकुमार आणि शुभांगना यांना दोन आपत्य आहेत. मोठ्या मुलीचे नाव वृद्धी असून मुलाचे नाव मिहीर असे आहे. 
- लग्नानंतर शुभांगनाने जसोदा देवी कॉलेजेस अॅन्ड इन्स्टिट्यूशन्सची स्थापना केली. ती या संस्थांची चेअरमन बनली. 
 

राजकुमारकडे महागड्या कारचा ताफा
राजकुमारकडे 1 कोटी रुपये किमतीची जॅग्वार एक्सजे, 42 लाखांची ऑडी ए 4, 60 लाखांची लँड रोव्हर, 78 लाखांची  बीएमडब्लू झेड 4 अशा कार आहेत. शहरात होणाऱ्या हायप्रोफाईल पार्टीजमध्ये तो नेहमीच दिसून येतो. 
 
 
पत्नीचा संशयास्पद मृत्यू...
- शुभांगना शुक्रवारी रात्री आपल्या मुलासोबत डिनर करून झोपण्यासाठी बेडरूमला निघून गेली. 
- शुभांगनाने शनिवारी उशीरापर्यंत दारच उघडला नाही. तेव्हा मिहीर आणि नोकरांनी बेडरूमचे दार उघडले. आतील दृश्य पाहून मुलगा जागेवर कोसळला. 
- त्याची आई फासावर लटकली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बेडरूम सील केले. तसेच कुटुंबियांच्या उपस्थितीत सोमवारी बेडरूमचा तपास करण्यात आला. 
 

मुलाने वडिलांना फोन करून दिली माहिती
शुभांगनाचे पती राजकुमार सावलानीने दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी रात्री मी सीतापुरा येथील कॉलेजमध्येच थांबलो होतो. त्यानंतर शनिवारी सकाळी माझ्या मुलाने फोन करून मला शुभांगनाबद्दलची माहिती कळवली. 
- घटना की सूचना उन्हें शनिवार सुबह बेटे ने फोन पर दी थी। राजकुमार ने बताया कि शुभांगना कई दिनों से डिप्रेशनमध्ये होती. ती आपल्या कामकाजावरून चिंतीत असावी अशी शक्यता पतीने वर्तवली आहे.
- गळ्यावर आवळण्याच्या खुना आणि फोन कॉलवरून तिचा मर्डर झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...