आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnath Appeals Muslims To Ignore Post Godhra Riots

गुजरातच्‍या दंगली विसरुन जा, भाजपचे मुस्लिमांना आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- गुजरातमध्‍ये 2002 मध्‍ये झालेल्‍या जातीय दंगली विसरण्‍याचे आवाहन भारतीय जनता पार्टीकडून मुस्लिम समुदायाला करण्‍यात आले आहे. भाजपचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात हे आवाहन केले. एका दूरचित्रवाणी वाहिनीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. गुजरातच्‍या दंगलींमुळे भाजपला लागलेले डाग पुसून काढण्‍यासाठी हा प्रयत्‍न असल्‍याचे बोलले जात आहे. नरेंद्र मोदींच्‍या करिष्‍म्यावर भाजप सत्ता काबिज करण्‍याचे स्‍वप्‍न पाहत आहे. परंतु, या आवाहनवर कशा प्रकारच्‍या प्रतिक्रीया उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, 2002पूर्वी देशभरात 13 हजार जातीय दंगली झाल्‍या होत्‍या. अशा घटना होत असतात. परंतु, आपण त्‍यांना विसरू शकत नाही का? आम्‍ही मुस्लिमांमध्‍ये आत्‍महविश्‍वास करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहोत. प्रेमाने आम्‍हाला मुस्लिमांचे हृदय जिंकायचे आहे, भय दाखवून नव्‍हे. भाजपला मानवतेचे राजकारण करायचे आहे. कॉंग्रेसप्रमाणे 'तोडा आणि राज्‍य करा' या तत्त्वावर आम्‍हाला राजकारण करायचे नाही. इंग्रजांनी हेच तत्त्व वापरून भारतावर राज्‍य केले. अजूनही तसेच राजकारण सुरु आहे, असे राजनाथ सिंह म्‍हणाले.

राजनाथ सिंह यांनी राजस्‍थानमध्‍ये भाजपच्‍या दोन मुख्‍यमंत्र्यांच्‍या शासनाचे उदाहारण दिले. भैरो सिंह शेखावत आणि वसुंधरा राजे सिंधिया यांच्‍या कार्यकाळात राजस्‍थानमध्‍ये अल्‍पसंख्‍यांकांसोबत कोणत्‍याही प्रकारचा भेदभाव करण्‍यात आला नाही. हे राजस्‍थानने प‍ाहिले आहे, असे राजनाथ सिंह म्‍हणाले.