आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी झेंडे फडकावणे, खपवून घेणार नाही, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खडसावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - फुटीरतावाद्यांच्या मोर्चावेळी पाकिस्तानी झेंडे फडकावणे आणि त्या देशाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्याची कृती खपवून घेणार नसल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकाशी चर्चा करण्याची केंद्राची तयारी असल्याचे सांगितले.

सिंह यांनी काश्मीर खोऱ्यातील तरुणांना फुटीरतावाद्यांच्या मोहाला बळी न पडण्याचे तसेच पाकिस्तान समर्थक घोषणाबाजी न करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही प्रत्येकाशी चर्चा करण्यास तयार आहोत. लोकशाहीमध्ये सर्वांशी संवाद राखला जातो. मात्र, त्याचबरोबर भारतात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी खपवून घेतली जाणार नाही, असे सिंग यांनी जनकल्याण पर्व सभेत सांगितले. देशविरोधी घोषणाबाजी देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर सरकार त्यानुसार कारवाई करत आहे. काश्मीर तरुणांची दिशाभूल केली जात आहे. भरकटलेली मुले पाकिस्तानचा झेंडा फडकावत असतील तर ती चांगली कृती नाही. संबंधित तरुणांनी या गोष्टींपासून दूर राहावे. तरूणांनी अशा संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला पाहिजे, असे मी आवाहन करतो. देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला प्रत्येकाचे सहकार्य हवे आहे. फुटीरतवादी काश्मीर तरुणांच्या भावनांशी खेळत आहेत. तरुणांनी देशातील रचनात्मक कार्यवाहीसाठी पुढे यावे, असे राजनाथ म्हणाले.
जगातील धोकादायक ठिकाणांच्या संख्येत वेगाने वाढ : राष्ट्रपती
नवी दिल्ली । दहशतवादाच्या उच्चाटनासाठी होत असलेल्या प्रयत्नाबद्दल चिंता व्यक्त करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जगातील धोकादायक ठिकाणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे म्हटले आहे. मूलतत्त्ववादी अमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारी कारवाईतून शस्त्रे मिळवत आहेत. धोकादायक ठिकाणांची संख्या वेगाने वाढत आहे, महत्त्वाची शहरे धोक्यात आहेत, असे राष्ट्रपतींनी आयएफएस प्रोबेशनर्सना सांगितल्याचे राष्ट्रपती भवनचे माध्यम सचिव वेणू राजमणी म्हणाले. राष्ट्रपती २०१३ बॅचच्या आयएफएस प्रोबेशनर्ससमोर बाेलत होते.
देशात वीज उत्पादनात २७ % वाढ
मोदी सरकारने देशाला सायलेंट मोडमधून अॅक्टिव्ह मोडमध्ये आणले , असे गृहमंत्री राजधान सिंह यांनी म्हटले आहे. यूपीएच्या काळात संरक्षण, कल्याणकारी योजनांच्या पातळीवर कोणतेही ठोस निर्णय घेतले गेले नाहीत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील विजेच्या उत्पादनात २७ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तच्या एका प्रश्नावर ते बोलत होते. २०१३-१४ दरम्यान देशात ३ हजार ६२१ किलो मीटरचा महामार्ग तयार करण्यात आले होते. २०१४-१५ मध्ये ७ हजार ९८० किलो मीटरचे महामार्ग तयार करण्यात आले. जी-२० मध्ये भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे. मोदी सरकारने काळ्या पैशाच्या मुद्द्यावर महत्वाची पावले उचलली आहेत. सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी आणि गरीब आहेत. त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...