आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह संघदरबारी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी शनिवारी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. गुरुवारी मुरली मनोहर जोशी, शुक्रवारी लालकृष्ण अडवाणी यांनी संघाच्या दरबारात हजेरी लावल्यानंतर येथे सलग तिसर्‍या दिवशी दाखल होणारे राजनाथ पक्षाचे तिसरे ज्येष्ठ नेते आहेत.

अन्नसुरक्षा नव्हे, मतसुरक्षा : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारची धोरणे असल्याची टीका राजनाथ यांनी केली. अन्नसुरक्षा नव्हे, केंद्र सरकारचे मतसुरक्षा विधेयक असल्याचेही ते म्हणाले.

दोन तास बंदद्वार चर्चा : राजनाथ यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी सुमारे दोन तास बंदद्वार चर्चा केली. या वेळी सहकार्यवाह भय्याजी जोशी उपस्थित होते. या चर्चेचा तपशील मात्र राजनाथ यांनी सांगितला नाही. एक स्वयंसेवक म्हणून संघ मुख्यालयात आपण येत असतो, असे ते म्हणाले. आघाडीत नव्या पक्षांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राजनाथ यांनी नमूद केले.

मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत पत्रकारांने छेडले असता, मुंडेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांच्यावर कोणती अतिरिक्त जबाबदारी देणार, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली.