आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे सामर्थ्य आता वाढले याची चीनला जाणीव, देशाच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित- राजनाथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- देशाच्या सीमा ‘पूर्णपणे सुरक्षित’ आहेत. भारत आता कमकुवत राहिलेला नाही हे चीनला समजण्यास सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले.  
 
भारतीय लोधी महासभेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राजनाथसिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून देश आता जगात बलशाली झाला अाहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिष्ठाही वाढली आहे. राजनाथ यांनी डोकलाम वादाचा उल्लेख केला.
 
ते म्हणाले की, भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत.  भारत आता कमकुवत देश राहिलेला नाही, त्याची ताकद वाढली आहे हे चीनलाही कळले आहे.  पाकिस्तानवर कडक टीका करताना सिंह म्हणाले की, पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवत आहे. भारताला तोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पण आमची सुरक्षा दले दररोज पाच ते दहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत.  

एखाद्या समाज गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणे म्हणजे मतपेढीचे राजकारण नव्हे, असा उल्लेख करून राजनाथ म्हणाले की, आम्ही फक्त मतांचे राजकारण करत नाही. आम्ही देश आणि समाजनिर्मितीसाठी राजकारण करतो. आमचे सरकार गरिबांसाठी समर्पित राहील असे सरकारची सूत्रे स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते.
 
आपला मुद्दा ठसवण्यासाठी राजनाथ यांनी जनधन योजना आणि उज्ज्वला योजनांचा उल्लेख केला. काँग्रेसचे सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. पण गेल्या साडेतीन वर्षांत आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही हे आम्ही ठामपणे म्हणू शकतो, असा उल्लेखही राजनाथ यांनी केला.  
 
२०२२ पर्यंत गरिबी हटवण्याचे उद्दिष्ट  
भाजप सरकारने स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे, त्याचप्रमाणे २०२२ पर्यंत देशातून गरिबी हटवण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे, असा उल्लेखही राजनाथ यांनी केला. आम्ही ही दोन्ही उद्दिष्टे निश्चित कालावधीत पूर्ण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच गरीब लोकांना बँकांत खाती उघडण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला, याची आठवणही त्यांनी करून दिली.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...