आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAK सीमेवर भारत उभारणार अभेद्य तटबंदी; कॉक्रीट, लेजर बीम आणि रडारने असेल भक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- भारत- पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमेवर लेजर बीम आणि रडारने अद्ययावत भक्कम तटबंदी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे घुसखोरीसह दहशतवादाच्या समस्येला आळा घालण्यात काही प्रमाणात यश मिळेल, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. सीमेवरील सुरक्षा भिंत 2018 पर्यंत बांधण्याचा प्रस्ताव आहे.

देशाच्या सीमावर्ती राज्यांच्या मंत्र्यांसोबत राजनाथ यांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्यात सीमेवरील राज्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला सीमावर्ती चार राज्यांचे मंत्री उपस्थित होते. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, गुजरात, राजस्थानचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा अनुक्रमे गुलाबचंद कटारिया, जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव ब्रिज राज शर्मा बैठकीत सहभागी होते.

पाकिस्तानसोबतच्या सीमेवर सुरक्षा भिंत बांधण्याचा विचार सरकार करत आहे. त्यानुसार प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही भिंत डिसेंबर 2018 पर्यंत बांधून पूर्ण होईल. सुरक्षा भिंतीबरोबरच सीमेवर अतिशय कडक स्वरूपाची निगराणी यंत्रणाही सुरू करण्यात येणार आहे. त्याचे नियंत्रण केंद्र राज्य सरकारच्या पातळीवर केले जाणार आहे.

सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल. काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यात येतील. ही नवीन कल्पना आहे. त्यासाठी सल्ला तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सीमा बांधण्यात येईल, असे राजनाथ म्हणाले.

पुढील स्लाइडवर वाचा, बीएसएफ, सुरक्षा यंत्रणेची निगराणी

बातम्या आणखी आहेत...