आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजफ्फरनगर दंगलः राजनाथ सिंह यांचा दौरा रद्द, भाजप आमदाराचे सरेंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- मुजफ्फरनगर दंगलीप्रकरणी आरोपी असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार संगीत सोम यांनी न्‍याालयात आत्‍मसर्पण केले आहे. दंगली भडकविण्‍याचा आरोपात अटक वॉरंट जारी केलेल्‍या 16 जणांमध्‍ये सोम यांचा समावेश आहे. भाजपचे आमदार सुरेश राणा यांना अटक केल्‍यानंतर सोम यांनी आज सरेंडर केले. बनावाट व्हिडिओ बनवून पसरविल्‍याचा आरोप सोम यांच्‍यावर आहे. संगीत सोम हे उत्तर प्रदेशमधील सर्वात तरुण आमदार आहेत.

दरम्‍यान, भाजपचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी मुजफ्फरनगरचा दौरा रद्द केला आहे. ते आज (शनिवार) दंगलग्रस्‍त भागाचा दौरा करणार होते. परंतु, जिल्‍हाधिका-यांनी त्‍यांना संपर्क साधून दौरा न करण्‍याची सूचना केली होती. आमदार सुरेश राणा यांच्‍या अटकेनंतर पश्चिम उत्तर प्रदेशमध्‍ये आज बंद पुकारण्‍यात आला आहे.