आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाचा खर्च टाळून रजनीकांतचे पूरग्रस्तांना 10 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी १२ डिसेंबरला आपला ६५ वा वाढदिवस साजरा करण्याचे टाळून चेन्नईतील पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची मदत केली. ही रक्कम मुख्यमंत्री जयललिता यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याची घोषणा त्याने यापूर्वीच केली होती.
रजनीकांतने यापूर्वी चेन्नई पूरग्रस्तांसाठी १० लाख रुपयांची मदत दिली होती. मात्र, यानंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून टीकेची प्रचंड झोड उठली. लोकांची ही भावना लक्षात घेऊन रजनीकांतने ही रक्कम १० लाखावरून थेट १० कोटी रुपये केली.

टीकेचे कारण काय?
रजनीकांतने १० लाख रुपये मदत जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर टीका होण्याचे कारण म्हणजे रजनीकांतच्या तुलनेत कमी कमाई असलेल्या एका तमिळ अभिनेत्याने चेन्नईमध्ये पूर आल्यानंतर १० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. रजनीकांतची कमाई तर त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
बातम्या आणखी आहेत...