आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतची लवकरच राजकारणात एंट्री; म्हणाले, राजकीय नेत्यांशी बोलणी सुरू....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई -  साऊथ सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्याची त्यांच्या चाहत्यांना खूप दिवसांपासून अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने गेल्या कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. यावर खुद्द रजनीनेच भाष्य करून चाहत्यांना दिलासा दिला आहे.
 
काय म्हणाले रजनीकांत?
- राजकीय प्रवेशाच्या चर्चेवर रजनीकांत यांनी, मी लवकरच चर्चेवर निर्णय घेऊन याबद्दलच घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. 

- या निर्णयासाठी त्यांनी काही राजकीय नेत्यांची भेटही घेतल्याचे कळते. यासाठी त्यांची नेत्यांसोबत बोलणी सुरू असून त्यांनी याबाबत माध्यमांसमोर खुलासा करण्यास मात्र नकार दिला.

- तथापि, या आठवड्यात त्यांनी एका स्थानिक संघटनेच्या सदस्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने त्यांच्या राजकीय प्रवेशावर पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली.
 
देवाच्या मनात असेल तर राजकारणात येईन...
- गत महिन्यात एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी वरील विधान केले होते. आपल्या आयुष्याचा कर्ता करविता देवच आहे. त्याने मला भूमिका करण्याची, नट होण्याची जबाबदारी दिली. त्याची इच्छा असल्यास मी राजकारणात येईन. मी जर पॉलिटिक्समध्ये आलो तर अत्यंत प्रामाणिकपणे काम करेन असे म्हणायलाही हा सुपरस्टार विसरला नाही. 

- रजनीकांतची लोकप्रियता पाहता त्यांना चाहत्यांचा भरभक्कम पाठिंबा आहे. तथापि, तिकीटबारीवरची गर्दी रजनी मतांमध्येही परिवर्तीत करू शकत असल्याने दक्षिणेत राजकीय भूकंपच येणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
बातम्या आणखी आहेत...