आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajsthan News In Marathi, Panchayat, Divya Marathi

पंचायतीने कुटुंबाला त्यांच्याच घरात डांबले,राजस्थानमधील बोटुंदा गावातील प्रकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजमहल (राजस्थान) - पंचमंडळीने गावातील एका कुटुंबाला घरात बंदिस्त करून कुलूप लावले. या कुटुंबावर समाजाने दीड वर्षांपूर्वी बहिष्कार टाकला होता. मुलीचे दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून पंचायत या कुटुंबावर नाराज आहे. दीड लाख रुपये दंड न भरल्यामुळे या कुटुंबाला पंचायतीने गुरुवारी बंदिस्त केले.

राजस्थानच्या दौसा परिसरातील बोटुंदा गावातील रेगर वस्तीमधील ही घटना आहे. कुटुंबाला कुलूपबंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तीन तासांनी पोलिसांनी गावात जाऊन घराचे कुलूप उघडून कुटुंबाला बाहेर काढले. पीडित कुटुंबातील संतरादेवी रेगर यांनी सांगितले की, आठ वर्षांपूर्वी त्यांनी मुलीचे लग्न बिसलपूर येथे केले होते. सासरचे लोक मुलीला नेत नव्हते. त्यामुळे त्रस्त होऊन त्यांनी मुलीचे लग्न देवळी गावातील एका व्यक्तीशी लावले. त्यानंतर समाजाच्या पंचमंडळीने या प्रकरणावर निकाल दिला. त्यानुसार वादाच्या दंडस्वरूपात दोन लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्याने ते दीड वर्षांपासून छळ करत आहेत. पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे संतरादेवी रेगर यांनी सांगितले.

पीडित कुटुंबाशी न बोलताच परतले पोलिस
समाजातील पंचमंडळीने रोषामुळे घेतलेल्या अत्यंत गंभीर निर्णयामुळे बहिष्कृत करण्यात आलेले रेगर यांचे कुटुंब गावात दयनीय स्थितीत जीवन जगत आहे. समाजाची पंचमंडळी पीडित कुटुंबाला पिण्याचे पाणी भरू देत नाही. समाजातील महिलाही अत्यंत अमानवी स्वरुपाची वागणूक देतात. कुटुंबातील महिला पाणी आणण्यास गेल्यास गावातील महिला त्यांची भांडी फेकून देतात. समाजातील कोणतेही कुटुंब रेगर कुटुंबातील सदस्यांन कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी करून घेत नाही.