आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत राज्यराणी एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले, जखमींना 50 हजारांची भरपाई, बचावकार्य पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामपूर - राज्यराणी एक्सप्रेस (क्र. 22454) चे 8 डबे शनिवारी रामपूरच्या ओसियापूर नजीक रुळावरून घसरले. या अपघातात केवळ 2 जण जखमी झाले असून सर्वांना बाहेर काढून दुसऱ्या रेल्वेने रवाना करण्यात आले असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले.  या रुळावरील मार्ग सुद्धा सुरळीत करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींना भरपाईची घोषणा केली. तर, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
चौकशीचे आदेश
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यराणी रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे ट्वीट केले. ते या घटनेवर बारकाईने नजर ठेवून आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी न्यावैद्यक समूह घटनास्थळी दाखल सुद्धा झाला.
 
नुकसानभरपाई जाहीर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये आणि इतर जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपये नुकसानभरपाई देणार अशी घोषणा केली. 
 
- पहाटे 4.55 वाजता निघणारी मेरठहून निघणारी राज्यराणी एक्सप्रेस हापुड़, अमरोहा, मुरादाबाद, रामपूर, बरेली, शाहजहांपूर, हरदोई मार्गे दुपारी 1 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास लखनौ पोहोचणे अपेक्षित असते.
- शनिवारीही राज्यराणी एक्सप्रेस मेरठहून पहाटे वाजता निघाली. मात्र, रामपूर स्थानकापासून अवघ्या 4 किमी जवळ अचानक रेल्वेत जोरदार झटके बसले आणि रेल्वेचे 8 डबे रुळावरून घसरले. 
- रेल्वेतील प्रवाश्यांच्या माहितीनुसार, सर्व काही अचानकच घडले. काही समजण्यापूर्वीच ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. सगळेच लोक एकमेकांवर जाऊन पडले आणि धावपळ उडाली. 
- जखमींच्या मदतीसाठी जवळपासचे स्थानिक धावून आले. त्यांनी सुरुवातीला जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था करून दिली. 
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रेल्वे मंत्रालयाचे ट्वीट आणि घटनास्थळावरील छायाचित्रे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...